Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, March 17, 2025

वर्षभरापासून सर्च की मध्ये तांत्रिक बिघाड ?**कर्ज काढून घरकुले बांधणाऱ्यांची मनोवस्था बिघडवणार*


मानोरा --तालुक्यातील इंझोरी परिसरातील मोदी आवास,रमाई आवास,शबरी आवास योजना अंतर्गत घरकूल मिळालेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचे काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले तरी अद्यापही एम आर जी एस अंतर्गत मिळणारे मस्टर चे पैसे व विस हजार रुपयांचा शेवटचा हप्ता मिळाला नसल्याचे लेखी निवेदन तालुका प्रशासनाला दिले आहे.
 मजुरीचे काम करीत असताना कर्ज काढून घराचे काम पूर्ण केले. ज्यामुळे कर्जबाजारी झालो आहोत. घेतलेले कर्ज कसे फेडावे हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा असल्याच्या व्यथा निवेदनकर्त्यांनी मांडल्या आहेत.  ग्रामपंचायतकडे वारंवार विचारणा केली असता  सर्च की दुरुस्त नसल्याचे तांत्रिक कारण सांगण्यात येते. सर्च की दुरुस्त करण्यासाठी एक वर्ष कसे काय लागते ? हा प्रश्न इंझैरी परिसरातील ह्या घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे.
आमची मागणी रास्त असून येत्या आठवड्यात प्रलंबित अनुदान न मिळाल्यास आम्ही घरकुलधारक आंदोलन करणार आहोत अशा प्रकारचे निवेदन गटविकास अधिकारी पं स मानोरा यांना देण्यात आले आहे. यावेळी इंझोरी येथील सीताराम रत्नपारखी, धनराज इंगळे,शरद हलदे,रघुनाथ कांबळे, अनिल राठोड,श्रवण नागोलकर,वंदना काळेकर,शोभा हळदे,मनोरम रत्नपारखी, प्रमिला पुंड,गणेश नायसे,कैलास डोंगरे ,जगदीश आरेकर आदी उपस्थित होते.

फोटो--

No comments:

Post a Comment

फॉलोअर