दिग्रस (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) – महाराष्ट्र दिन विशेष भव्य लॉटरी सोडतीत दिग्रस येथील एका भाग्यवंताने तब्बल २५ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले आहे. विजयी तिकीट क्रमांक MD06 6242 हे इंगोले लॉटरी सेंटर, शिवाजी चौक, दिग्रस येथून खरेदी करण्यात आले होते.
या ऐतिहासिक विजयानंतर संबंधित भाग्यवंताने इंगोले लॉटरी सेंटरचे संचालक सुयश इंगोले यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.
सुयश इंगोले यांनी सांगितले की, "आमच्या सेंटरमधून एवढ्या मोठ्या रकमेचे पारितोषिक जिंकले गेल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो. यामुळे दिग्रस शहराची ओळख आता राज्यभरात झाली आहे."
– दिग्रस एक्सप्रेस
No comments:
Post a Comment