मानोरा :-( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
तालुक्यातील माहुली येथील शेत मजुरी करत असलेल्या कुटुंबातील कु.किरण संतोष जाधव यांना नीट परीक्षेत 720 पैकी 554 गुण मीळाल्याने दि.17 जुन रोजी संत सेवालाल महाराज सभागृहात त्यांचे सत्कार करण्यात आले.
गरीब अत्यल्पभुधारक 2 एकर शेती असलेल्या
कुटुंबातील शेतकरी संतोष प्रल्हाद जाधव यांची मुलगी कु. किरण संतोष जाधव हिला निट परीक्षेत 720 पैकी 554 गुण मीळाले आहे.
यावेळी संत सेवालाल महाराज संस्थान कमीटी कडुन शाल,श्रीफळ,फुलाचे हार टाकुन सामुहीकरित्या सत्कार करणयात आले.आणि यावेळी किरण चे आई-वडील यांचे पण सत्कार करण्यात आले.
सत्कार कार्यक्रमावेळी किरण यांच्या संपुर्ण शैक्षणीक क्षेत्रावर प्रास्तावीक आणि सुत्रसंचालन पंडीत राठोड यांनी केले.आणि भारत राठोड यांनी पण किरण यांच्या शिक्षणाविषयी आपले मत व्यक्त केले.शिक्षण घेतांना कोणत्या अडचणी आणि समस्या आलेत याविषयी किरण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सत्कार कार्यक्रमावेळी चंद्रकांत काजळे,गजानन डवले,भारत राठोड,श्रीकृष्ण राठोड पंडीत राठोड,गोपाल राठोड,अमोल पवार,
सुरेश जाधव,रमेश आडे,कैलास चव्हाण,नीतीन राठोड,अमोल महाराज पुजारी,जगदीश राठोड,
विनोद राठोड,बंडु राठोड,संतोष जाधव व गावातील शेकडो नागरीक,तरूण युवक,
विद्यार्थ्यी,आणि महीला भगीनी उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment