मानोरा:-- तालुक्यातील कुपटा येथील उपसा सिंचन प्रकल्पात म.जि.प्रा.कडुन धरणाच्या बुडीत क्षेत्रात विहीरीतुन निघालेले मुरूम,दगड चेनिंग करुनपोकलँड च्या सहायाने दाबण्यात आलेले मटेरीयल काढण्यात यावे यांच्या निषेधार्थ कुपटा,चोंढी,गोरेगाव,वागद बु।,व वागद तांडा येथील शेतकरी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन केले.
तब्बल तीन तास त्या ठिकाणी कोणीही प्रशासकीय अधिकारी दखल घेण्यास आला नसल्याचा आरोप आंदोलन करताना आहे.
आधी कुपटा लघु पाटबंधारे विभागाकडून कुपटा येथील उपसा सिंचन लघु प्रकल्पात शेकडो ब्रास मुरूम दाबल्याच्या निषेधार्थ आज कुपटा येथील लघु प्रकल्पात शेतकऱ्याने जलसमाधी आंदोलन केले. हे आंदोलन सकाळी साडेदहा वाजता सुरू झाले. आंदोलन शेतकरी तब्बल तीन साडेतीन तास पाण्यामध्ये होते त्यामध्ये त्यांची एकच मागणी होती की यामध्ये जो शेकडो ब्रास मुरूम दाबल्यात आलेला आहे. तो काढून टाकण्यात यावा कारण त्यामुळे धरण क्षेत्रात जलसाठ्याचे प्रमाण कमी होणार आहे परंतु त्याकडे गांभीर्याने न घेता. मुद्दाम शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले व साचलेला शेकडो ब्रास मुरूम त्याच ठिकाणी स्नॅचिंग करून दाबण्यात आले ही संपूर्ण शेतकऱ्यांची दिशाभूल व सरकारच्या पैशाची अफरातपरी या प्रकरणात झाली असून वारंवार निवेदन देऊनही त्याकडे मुद्दाम डोळेझाक करण्यात आल्याच्या निषेधार्थ चोंढी,गोरेगाव,राजीवनगर,वागद तांडा, येथील उल्हास चव्हाण रमेश राठोड उत्तम चव्हाण पोलीस पाटील राजीव नगर, महादेव पिचकाटे, अरुण जाधव, रमेश लांडगे, सुनील मावळे, युवराज चव्हाण, सरपंच राजू राठोड, उदय राठोड, जीवन चव्हाण,नामदेव चव्हाण, गजानन गावंडे, सुभाष चव्हाण इ. शेतकऱ्यांनी पाण्यात तब्बल साडेतीन तास आंदोलन करून घोषणाबाजी केली .
सहाय्यक महसूल अधिकारी संदीप आडे साहेब यांनी भेट दिली व आम्ही तुमचं बोलणं कलेक्टर मॅडम यांच्याशी उद्या दि.१९ जून०२५ ला करून देऊ असे आश्वासन दिले. यावेळी मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण शिंदे हे आपल्या ताफ्यासह उपस्थित होते त्यांनी आंदोलकांना वेळोवेळी विनंती केली परंतु आंदोलकांनी या मागणीसाठी कित्येक वेळा निवेदन देऊन किती वेळा पत्रकातून कोणतीही दखल न घेतल्यामुळे ते ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते.
साडेतीन तास पाण्यामध्ये राहिल्यामुळे चोंडी येथील उल्हास चव्हाण हे शेतकरी आजारी पडले असून. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व प्रशासकीय व्यवस्थेविरुद्ध व सरकार विरुद्ध प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता आंदोलकांनी हे तात्पुरतं आंदोलन थांबवलं असून उद्या कलेक्टर मॅडम यांच्याशी या विषयावर चर्चा केल्यानंतर पुढील दिशा ते ठरवणार आहेत.
फोटो--
No comments:
Post a Comment