Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, June 18, 2025

निसर्ग जाधव ची एमएच-सीइटी मध्ये चमकदार कामगिरी. पीसीएम शाखेत ९३ पेक्षा अधिक घेतले पर्सेंटाइल


 मानोरा :-- राज्य सामायिक परीक्षा  कक्षा कडून सन  २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहे त्यात तालुका निवासी निसर्ग नामा जाधव यानी महाराष्ट्र शासनाकडुन घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी च्या एमएच सीइटी परीक्षेत पीसीएम शाखेत ९३.२३५०परसेंटाइल घेत आपले चिखली गाव व मानोरा तालुकयाचे नाव रोशन केले आहे. 
निसर्ग जाधव हे  अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव, पोरियातारा टीचर्स एंड प्रोफेसर असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव नामा बंजारा आणि शिक्षिका सौ. जयश्री नामा जाधव यांचे चिरंजीव आहेत.  निसर्ग जाधव  यानी जेईई मुख्य ( JEE Mains) मध्ये सुद्धा ९४.०३  परसेंटाइल गुण मिळविले आहे.
 व्ही आय टी ट्रिपल इ चेन्नई मध्ये त्याचा प्रवेश निश्चित  होता मात्र आईवडिलाच्या आग्रहाखातर त्यांने चेन्नई येथे प्रवेश घेतला नाही. 
निसर्ग जाधव याचे अजुन आय आय एस इ  आर व नायझेर (NIZER) चे निकाल येणे बाकी आहे. 
निसर्ग जाधव हे कदाचित ९९  पेक्षा अधिक परसेंटाइल घेणारा बंजारा समाजाचा पहिला विद्यार्थी असावा. त्याने आपल्या कुटुंबासोबतच जिल्ह्याच्या व बंजारा समाजाच्या प्रतीस्ठेत मानाचा तुरा रोवला आहे. निसर्गाच्या या यशाबद्दल मित्र मंडळी व समाज बाँधवानी त्याचे भरभरुन कौतुक केले आहे.

फोटो ---

No comments:

Post a Comment

फॉलोअर