Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, January 27, 2026

शेती आणि भावी पीढीचे भविष्य वाचविण्यासाठी मानोरा येथे शेतकरी संघटनांचा संवाद मेळावा

मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
           गेल्या काही वर्षांपासून वैश्विक तापमान बदलामु‌ळे  येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, अवर्षण, पावसातील खंड, तर कधी अवकाळी पावसामुळे दरवर्षी पिकांची होणारी प्रचंड हानी आणि
त्यावर उपाय म्हणून सरकारने आणलेल्या पिकविमा व इतर योजनांचा फायदा शेतकऱ्यांऐवजी कंपन्यानाच होत असल्याचे सिद्ध झाले आहे. रानटी प्राण्यांचे नवे जीवघेणे संकट आले आहे.
वरील सर्व संकटावर मात करून हाती आलेले पीक शेतकरी विरोधी सरकारी धोरणामुळे मातीमोल भावात विकावा लागतो.  परिणामी कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्या करतो हे सध्याचे भयंकर वास्तव्य आहे. 
           १९७० च्या दशकात दाण्या दाण्याला मौताज असलेला देशात आज धन्य धान्याने समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्यावर आत्महत्या करून मरण्याची वेळ का येते?  ह्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी तसेच जगातील सर्वात सुपीक असलेली शेती मूठभर भांडवलदाराच्या घशात घालून भावी पिढीला कंगाल करण्याचे  कारस्थान लक्षात रचनाऱ्या विरुद्ध रणसिंग फुकन्यासाठी, भावी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येत्या शुक्रवारी 30 जाने रोजी मानोरा येथे सर्व शेतकरी संघटनानी एकत्र येऊन एका चर्चा सत्रांचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या  खजान्याला करोडो मुद्रांची देणगी देणाऱ्या आपल्या वाशिम जिल्ह्याचा उल्लेख भारतातील "सहावा" आणि महाराष्ट्रातील "एकमेव" मागास जिल्हा म्हणून का होतो?  ह्याचे आत्मपरीक्षण करून जगातील सर्वात सुपीक शेती असलेला वाशिम जिल्हा पुन्हा संपन्न करण्याच्या संकल्पची सुरुवात मानोरा तालुक्यातून करण्याचा माणस शेतकरी संघटनानी व्यक्त केला आहे.या शेतकरी संवाद मेळाव्याला वाशिम जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी बंधु भागिनिनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटना, प्रहार संघटना, रयत क्रांतीकारी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, क्रांतिकारी शेतकरी संघटना भूमिपुत्र शेतकरी संघटना, तांडा सुधार समीती,स्वतंत्र भारत पक्ष,किसान ब्रिगेड, विदर्भ राज्य आंदोलन समीती, कन्हैया ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजक डॉ. विट्ठल घाटगे, गजानन आमदाबादकर, हर्षद देशमुख, राजकुमार दिघडे, श्याम पवार, राजु रत्ने, रामराव चव्हाण, विलास राठोड, बंडु कोल्हे, धर्मराज आड़े, रितेश घाडगे,नामा बंजारा इत्यादिंनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर