Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, January 27, 2026

संजय भुजाडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान

मानोरा : वेदभारती नाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय चंद्रभाग भुजाडे यांना छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कारंजा येथील महेश भवन येथे दि. १८ जानेवारी रोजी हा सोहळा उत्साहात पार पडला. समाजसेवा, शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील भुजाडे यांच्या कार्याची दखल घेत ट्रस्टच्या वतीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते भुजाडे यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, मेडल, फेटा व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी आमदार डहाके यांनी समाजाच्या जडणघडणीत सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमास ज्योतिषाचार्य सागर महाराज देशमुख, वेदभारती नाथ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पुनम एकनाथ पवार, सचिव एकनाथ पवार, इंडियन मेडिकल असोसिएशन कारंजाचे डॉ. पंकज काटले, ट्रस्टचे पदाधिकारी, मानोरा व कारंजा परिसरातील नागरिक तसेच भुजाडे यांचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे संजय भुजाडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर