विश्वास बसत नाही...
इतका जीवाभावाचा, सेवाभावी, परखड, तडफदार, सर्वांच्या हक्कासाठी लढणारा, असं नेतृत्व… केतन… आज नाही?
हा शब्द उच्चारताना मनावर एक दगड ठेवावा लागतोय…
तो प्रत्येकाचाच वाटायचा… कुणाच्या ही संकटात धावत जायचा, दुःख झेलायचा…
*दिग्रसच्या रस्त्यावरून फिरताना एखादा आजारी, वृद्ध, गरजू, अन्याय सहन करणारा माणूस दिसला, की केतन पहिल्यांदा त्याच्याकडे वळायचा…*
आपलं घर, वेळ, पैसा, झोप – सगळं बाजूला ठेऊन तो लोकांच्या सेवेसाठी धावायचा.
केतन म्हणजे खंबीर निर्धार.
त्याच्या डोळ्यांत पुढचं दिग्रस दिसायचं.
त्याच्या मनात सर्व सामान्य जनतेचं भलं होतं.
माझ्यासाठी केतन हा केवळ , जिवाभावाचा मित्र होता.
त्याने माझ्या अनेक बातम्यांमधून, लेखांमधून लोकांपर्यंत जाणारी आशा बनवली होती.
मी त्याला अनेकदा म्हणालो होतो –
"केतन, तुझं काळ फुलणार आहे. तू या शहराचा नेता होशील, आणि माणसांच्या मनातली माणूस म्हणून कायम जिंकलास."
पण नियतीच्या क्रूर विडंबनापुढे कोणाचंच काही चालत नाही…
आज दिग्रसचं काळीज हललंय…
आज रस्त्यावर शांतता नाही, शोक आहे…
आज मैफिलीतील गोंगाट नाही, अश्रूंचा आक्रोश आहे…
तुझं जाणं म्हणजे फक्त तुझ्या घराचं दुःख नाही…
हे आमचं सगळ्यांचं वैयक्तिक नुकसान आहे.
तू फक्त ताईंचा भाऊ, आईचा आधार, बायकोचा संसार नव्हतास…
तू आमच्यासारख्या शेकडोंचा “आपला माणूस” होतास.
केतन, तुझ्या आठवणी, तुझं कार्य, तुझं हसणं… दिग्रसच्या मातीशी कायमचं एकरूप झालं आहे.
तू नव्या इनिंगला सुरुवात करत असताना, नियतीने तुझ्या आयुष्याचा पानच बंद करून टाकला.
या ओळी, माझ्या अश्रूंनी ओलावल्या आहेत.
मन हेलावून जातं, शब्द अपुरे वाटतात, आणि काळीज तुटतं…
भावपूर्ण श्रद्धांजली!
– जगदीश राठोड
संपादक
साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस
No comments:
Post a Comment