Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, March 27, 2025

दिग्रस येथे "शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण शिबिरात" तालुक्यातील ८०४ शिक्षकांचा समावेश

दिग्रस येथे "शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण शिबिरात" तालुक्यातील ८०४ शिक्षकांचा समावेश*
दिग्रस :-
          दिग्रस पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत जवळच असलेल्या सावंगा येथील ईश्वर देशमुख सैनिक शाळेत पाच दिवसीय "क्षमतावृद्धी प्रशिक्षणाचा" दुसरा टप्पा सुरू आहे . तालुक्यातील ८०४ माध्यमिक , उच्चमाध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचा यात समावेश आहे . 
          राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० , राज्य अभ्यासक्रम आराखडा , शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा-स्काफ , क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया , क्षमता आधारित मूल्यांकन , क्षमता आधारित प्रश्ननिर्मिती कौशल्ये , अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्ननिर्मिती  विचारप्रवर्तक प्रश्न , समग्र प्रगतीपत्रक आदी विषयावर एकूण ३६ सुलभक-तज्ञमार्गदर्शकांनी प्रशिक्षणार्थ्यांना विस्तृत माहिती देऊन मार्गदर्शन केले . 
          दिग्रस तालुक्यात दोन टप्प्यात सदर प्रशिक्षण घेण्यात येत असून पहिल्या टप्प्याचा १६४ प्राथमिक तसेच २३७ माध्यमिक शिक्षकांनी लाभ घेतला . दुसऱ्या टप्प्यात १७० प्राथमिक , तर २३३ माध्यमिक शिक्षक , अशा प्रकारे एकूण ८०४ शिक्षकांचा समावेश आहे . यावेळी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , पुणेद्वारा तयार करण्यात आलेल्या "शिक्षक मार्गदर्शिकेचे" वाटप देखील करण्यात आले . 
          दिग्रसचे गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी संतोष गवारे , केंद्र प्रमुख हेमंत दळवी , गिरीश दुधे , मयूर दुधे , प्रशिक्षण समनवयक प्रशांत कवठकर , गटसाधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती जयश्री ढोले , अश्विनी निमकर , तौकीर बेग मिर्जा , सचिन अस्वार , गोपाल गंगापुरे , लता चव्हाण , भारती बगडे , ईश्वर देशमुख सैनिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे . 

No comments:

Post a Comment

फॉलोअर