Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, April 17, 2025

बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती दिग्रस येथे उत्साहात साजरी




दिग्रस (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) – मा. खासदार संजयराव देशमुख (यवतमाळ-वाशिम लोकसभा) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती दिनांक 14 एप्रिल रोजी दिग्रस येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री दुर्गा माता बहुउद्देशीय क्रीडा व शैक्षणिक संस्था चिंचोली क्र. २, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था चिंचोली क्र. २, श्री कान्होबा क्रीडा व शैक्षणिक संस्था चिंचोली क्र. २ आणि ईश्वर फाउंडेशन, दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. युवराज मानकर (बाभुळगाव) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचे शिक्षणासाठीचे संघर्ष, संविधान निर्मितीतील योगदान, सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रयत्न यावर प्रकाश टाकला.

ते म्हणाले की, “डॉ. आंबेडकर हे केवळ कायदेतज्ज्ञ नव्हते, तर ते क्रांतिकारक विचारवंत होते. त्यांनी समतेच्या समाजाची उभारणी केली. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे, हे त्यांनी सिद्ध केले.” शिक्षकांनी बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवण्याचे महत्त्व सांगून, “शिक्षकच समाज घडवतात, त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिक आहे,” असे ते म्हणाले.

तसेच, त्यांनी संविधान जागृती, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे, अंधश्रद्धा आणि धर्मांधपणाविरोधात लढा देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. “प्रत्येक घरात आणि गावात संविधानाचा जागर व्हायला हवा,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संतोष गुघाणे होते, तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य दीपक कोटुरवार यांची होती. संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन प्रा. डॉ. दीपक उलेमाले यांच्या मार्गदर्शनात पार पडले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य रणजीत तिजारे यांनी मानले.

या कार्यक्रमाला सौ. वैशालीताई देशमुख (मा. सचिव) यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

फॉलोअर