Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, April 18, 2025

" संस्था चालक शिक्षकांना गुलामाची वागणूक देतात " ? प्रोफेसर डॉ अनंतकुमार सूर्यकार, मांगूळ यवतमाळ



खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गांना संस्था चालक गुलाम समजतात काय ?
या प्रश्नाचे  ' होय ' हेच सडेतोड उत्तर आहे.  काही अपवाद ( ५% ) वगळता ९५% संस्थानिक शिक्षकांना वेठबिगार व गुलाम  समजतात. 
आज सकाळी ' लोकमत 'वृत्तपत्र वाचायला घेतले आणि डोळ्यांसमोर ठळक शीर्षक झळकले ते असे  की , ' संस्था सचिवाच्या छळामुळे शिक्षकाची आत्महत्या '. 
मित्रांनो, आपणापैकी अनेकजण अशा प्रकारच्या बातम्या दैनंदिन वाचत असता . थोडावेळ आपणास दु:ख होते, परंतु ज्यांनी आत्महत्या केली असते त्यांच्या एकूणच जीवनाचा आलेख डोळ्यासमोर ठेवून थोडातरी हृदयाला पीळ द्यावा. आत्महत्या करणे हे षंढपणाचे लक्षण आहे. तो फार मोठा पुरुषार्थ नाही . तरीही तो गेला इतपत ठीक आहे परंतु त्याच्या या आत्महत्येतेची पाळेमुळे काय असावीत ?  पत्नी, मुले  , आईवडील इ. सर्वांचा विचार त्याने का करू नये ? आपले दोषारोपण आत्महत्या करणा-या व्यक्तीवर असणे हेही  बरोबर आहे . मित्रांनो, त्याने सारासार विचार करून आता यापलीकडे काहीच नाही इथपर्यंत येऊन ही टोकाची भूमिका घेतली असावी आणि असते . ज्या संस्था चालकामुळे त्याने हे पाऊल उचलले असते ती मग्रूर, निष्ठूर, निर्दयी, क्रूर व हिंसक असतात . संस्थानिक कशी वागतात ते तर तपासा  ? आपणास संस्था चालकांची बेछूट , बेलगामी, हृदय शून्य वागणूक लक्षात येईल.👇
शैक्षणिक संस्था अध्यक्ष, सचिव, संचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि पोसलेले बगलबच्चे यांच्या छळामुळे अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आत्महत्या करतात. ही वास्तविकता आहे.
अनेक खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये जवळचे नातलग, काही ठिकाणी संस्थाचालकसुद्धा तसेच हस्तकसुद्धा नौकरीवर असतात. या सर्वांना कामाची सुट असते . फक्त पगाराचे वाटेकरी असतात.त्यांची कामे भोळ्या, गरीब कर्मचाऱ्यांना करावी लागतात. जो नोकरवर्ग कुणाच्यातरी शिफारसीने आला असतो त्याच्याकडून भरमसाट देणगी घेतली जाते. तोही देण्यास तयार असतो . सर्व कामे करण्याची हमी त्याला दिली जाते. अनेक शाळा महाविद्यालयात रूजू होतेवेळी राजीनामासुद्धा लिहून घेतल्या जातो . ही वस्तुस्थिती आहे. बगलबच्चे, नातेवाईक ऐष करतात आणि ज्यांचे कोणी वाली नाही त्यांचेकडून मरमर कामे करून घेतली जातात. तुम्ही म्हणाल ,कामे म्हणजे कोणती ? ऐका मग - शेतात पाठवीणे, मजूर पाहून शेतात नेणे, कारखान्यात पाठविणे, दुकानातील कामे, माहेवारी पगारामधून प्रत्येक महिन्याला पैसा घेणे , घरची कामे करणे, मुलांना शाळेत नेणे-आणणे, कुणाच्याही समोर वाट्टेल ते बोलणे ( अश्लील ) , विद्यार्थ्यांसमोर पाणउतारा करणे , लग्न व इतर कामासाठी घरगडी म्हणून वापर, अंगावर हात उगारणे, एखाद्या कामात चूक झाल्यास मेमो देणे, वारंवार नौकरीतून काढायच्या धमक्या, कर्मचाऱ्यांच्या घरी मरण, लग्न इतर समारंभ असल्यास सुट्टी न देणे, अनेक शिक्षकांच्या चौकीदारासारख्या ड्युट्या लावणे , कामानिमित्त सुट्टीवर गेल्यास, आजारी असल्यास पगार कपात करणे , शासकीय आर्थिक लाभ मिळत असल्यास ६०% वाटा मागणे इ. आणि याहीपेक्षा अनंत छळवणूक संस्था चालक करतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक ( स्त्रियांबाबत ) व सामाजिक दृष्ट्या अतोनात छळ होतो.
अलीकडील काळात तर शाळा महाविद्यालयाचे पीक गाजर गवताखारखे उगवत आहेत. ज्याला शाळेचा ' श ' समजत नाही आणि राजकीय वरदहस्त असला की , समजून घ्यावे.अशांना शाळा महाविद्यालये मिळालेच .
मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कलम ३०अन्वये संस्था चालविण्याचा अधिकार शैक्षणिक संस्थांना दिला आहे, परंतु हा अधिकार राज्याच्या नियमन आणि नियंत्रणाच्या अधीन आहे. जर शिक्षकांची शैक्षणिक पात्रता राज्य ठरवीते तर मग संस्थानिकांना अधिकार का बरे दिल्या जाते ?  कलम २९ हा मूलभूत तर कलम ३० हा घटनात्मक अधिकार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार असला तरी शिक्षणाचे मानक कल्याण सुनिश्चित करण्यासाठी किंवा गैरप्रशासन रोखण्यासाठी शक्य करू शकणा-या नियमांचे पालन केले पाहिजे.
सरकार ,अशा वेठबिगार कर्मचा-यांना मानाचे स्थान देईल काय ? हुकूमशाही व निगरगट्ट संस्थेकडे लक्ष देईल काय ?

No comments:

Post a Comment

फॉलोअर