वाशिम,दि.२६ एप्रिल (साप्ता. दिग्रस एक्सप्रेस) – सन २०२४ मध्ये वाशिम जिल्ह्यातील विविध भागांमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानभरपाईसाठी शासन निर्णयानुसार पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, आतापर्यंत ७८,४१५ शेतकऱ्यांना एकूण ९ हजार ६०५ लक्ष ७६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून ६ हजार ९७८ लक्ष ८३ हजार रुपये रक्कम वितरित करण्यात आली आहे. वितरित निधीपैकी ई केवायसी न केल्याने प्रलंबित असलेल्या खातेदार १० हजार ५०८ आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप ई-पोर्टलद्वारे तालुका स्तरावर सुरु आहे. शासनाने यासाठी ६ निर्णय पारित केले असून, त्यानुसार ही मदत थेट खात्यात जमा करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनो लक्ष द्या !
नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतीची भरपाई प्राप्त न झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा. कोणतीही अडचण असल्यास डीबीटी पोर्टलवरील माहिती तपासून कार्यवाहीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
No comments:
Post a Comment