Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, April 16, 2025

शिक्षक संघटनांकडून सेवानिवृत्तांचा सामुहिक सत्कार!जिल्ह्यातील एकमेव आयोजन,सर्व संघटनांचा एकत्रित पुढाकार..!

दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क )येथील जिल्हा परिषद शिक्षकांच्या समन्वय कृती समितीने या वर्षात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा एकत्रित सत्कार केला. गेले वर्षभरात जिल्हा परिषद शाळांमधून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना पंचायत समितीत कार्यरत सर्व शिक्षकांकडून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील हा अशाप्रकारचा एकमेव सन्मान सोहळा आहे, हे विशेष!
दिग्रस तालुक्यात कार्यरत जिल्हा परिषद शिक्षकांच्या विविध संघटनांची सन्मवय कृती समिती स्थापन करण्यात आली असून या कृती समितीच्या माध्यमातून शिक्षक हितैशी विविध उपक्रम हाती घेतल्या जात आहेत. यातीलच एक असणारा सेवानिवृत्त शिक्षकांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा होय. यावर्षात असा सत्कार सोहळा दोनदा आयोजित करण्यात आला. नुकताच दुसरा सोहळा येथील संत श्री. गजानन महाराज मंदिर परिसरात पार पडला. गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार सेवापूर्ती सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तर सहाय्यक गट विकास अधिकारी विलास जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विस्तार अधिकारी संतोष गवारे, केंद्रप्रमुख हेमंत दळवी, गिरीश दुधे, समन्वय कृती समितीचे अध्यक्ष पुंडलिक उबाळे, सचिव चंद्रशेखर नवरे मंचावर उपस्थित होते. यावेळी सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना सन्मानपूर्वक फेटा बांधून मंचावर बसविण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. पाहुण्यांच्या स्वागतानंतर सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला. यावेळी दीपक माहूरकर, प्रमोद थापे, इंदू अडपवार, नीता बावनकुळे, सामना परवीन अजमल खान, संजय चिंधे, रमेश कमठाणे, पुंडलिक माहूरकर, उत्तम पारधी, नरेंद्र थोरात या 11 सेवानिवृत्त शिक्षकांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित उत्तम मनवर आणि अब्दुल सईद यांना तर नवोदय विद्यालय निवड यादीत 3 विद्यार्थी निवडल्या गेल्याने नितीन डहाके यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. दिग्रस पंचायत समितीत कार्यरत शिक्षक हे एक कुटुंब असून या कुटुंबाने असेच एकत्रित राहून शिक्षकांनी आपल्या एकजुटीचे प्रदर्शन वेळोवेळी करायला हवे असे प्रतिपादन मुकेश कोंडावार यांनी केले. शिक्षकांच्या या आगळ्यावेगळ्या सत्कार सोहळ्याचे कौतुक करीत या उपक्रमात सातत्य ठेवण्याचे आवाहन विलास जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुंडलिक उबाळे यांनी, सूत्र संचलन आमीन चौहान यांनी तर आभार चंद्रशेखर नवरे यांनी मानले. दीपक माहूरकर, उत्तम मनवर आणि नरेंद्र थोरात यांनी सत्काराला उत्तर दिले. स्नेहभोजनाने सेवापूर्ती सोहळ्याची सांगता झाली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांनी पुढील कार्यक्रमासाठी देणग्या जाहीर करून आपला सहभाग निश्चित केला. 
तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी आणि शिक्षक सहकुटुंब या सोहळ्यास उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

फॉलोअर