Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, May 12, 2025

परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या जन्मदिनानिमित्त मानोरा येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) –
परमपूज्य आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्या १३ मे रोजी येणाऱ्या जन्मदिनानिमित्त आर्ट ऑफ लिविंग परिवार, मानोरा यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

दिनांक १२ मे रोजी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एकूण ४१ रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपले सामाजिक भान जपले. या उपक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून आयोजकांचे कौतुक केले. यामध्ये मा. श्री चंद्रकांतदादा ठाकरे (मा. जिल्हा परिषद अध्यक्ष), मा. श्री राजूभाऊ गुल्हाने (प्रदेश उपाध्यक्ष रा.कॉ. ओबीसी), मा. डॉ. संजयजी रोठे (सभापती कृ.ऊ.बा.स. मानोरा), मा. श्री अरविंद इंगोले (तालुका अध्यक्ष भाजपा), मा. श्री गोपाल भोयर (पं.स. सदस्य), मा. श्री भास्कर पाटील (संचालक कृ.ऊ.बा.स. मंगरूळपीर), मा. श्री आशिषजी पाटील (अध्यक्ष सरपंच संघटना) व मा. श्री मनोहर राऊत इत्यादी मान्यवरांचा समावेश होता.

या निमित्ताने १३ मे रोजी गुरुपूजा, सत्संग, ध्यान व प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम सकाळी ७ वाजता कृष्णकुंज कॉम्प्लेक्स, पेट्रोल पंपाच्या बाजूला, मानोरा येथे पार पडणार आहेत.

गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांनी संपूर्ण देशवासीयांना आणि त्यांच्या अनुयायांना दोन वेळा ध्यान करण्याचे व प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. ध्यानामुळे व्यक्ती स्वतः तणावमुक्त व सकारात्मक तर होतेच, शिवाय त्याचा परिणाम इतरांवरही सकारात्मक होतो, असे त्यांनी आपल्या संदेशात सांगितले आहे.

या संपूर्ण उपक्रमांमधून गुरुदेवांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होत असून, आयोजकांनी सर्व नागरिकांना १३ मे रोजीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

– 

No comments:

Post a Comment

फॉलोअर