मानोरा :- तालुक्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका ग्रामस्थासह शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसत असून अनेक गावांमध्ये शेतीविषयक कामासाठी ये-जा करण्याचे रस्ते वाहून गेले आहेत तर कुठे निर्माणाधीन असलेल्या रस्त्यांच्या चिखलात ट्रॅक्टर, बैलगाड्या फसून शेतकऱ्यांना आर्थिक, शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
कारखेडा येथून चिखली पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू असून पावसामुळे या रस्त्यावरील मुरूम माती प्रचंड शिखलमय झालेली आहे.
कारखेडा येथील अनेक शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती या रस्त्यावर असून खरीप हंगामाच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना आपल्या शेतशिवारात ट्रॅक्टर बैलगाड्या लागतात.
स्थानिक शेतकऱ्याचा ट्रॅक्टर या निर्माणाधीन रस्त्यातील चिखलात फसला असून रस्ता काम करीत असलेल्या बांधकाम कंत्राटदार अतुल नांदगावकर कारंजा यांना आपल्याकडील जेसीबी मशीन द्वारा या ट्रॅक्टरला काढण्यास मदत करण्याची विनंती केली असता संबंधित सरकारी विभाग व अभियंत्यांना जाऊन सांगा असे उद्धट उत्तर कंत्राटदार देत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment