Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, July 14, 2025

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका: प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकती/सूचना मागवल्या


वाशिम,दि.१४ जुलै (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम ४५) च्या कलम ९२ पोट-कलम (१) अन्वये वाशिम जिल्ह्यातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जिल्हा परिषद क्षेत्रांतील निवडणूक विभागांची व कलम ५८ (१) (अ) अन्वये पंचायत समित्यांमधील निवडणूक गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत राज्य शासनाने प्राधिकृत केलेले अधिकारी जिल्हाधिकारी, वाशिम यांच्या क्रमांक २०२५/जि.प.नि./कावी- ४१९ दिनांक १४/०७/२०२५ च्या आदेशानुसार अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेद्वारे प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत.

याबाबतची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी  एस. यांनी दिली आहे. अधिसूचनेनुसार, प्रारूप प्रभाग रचना पुढील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे:
(१) जिल्हाधिकारी, वाशिम यांचे कार्यालयातील फलकावर.
(२) जिल्हा परिषद, वाशिम यांचे कार्यालयातील फलकावर.
(३) तहसीलदार, कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड व वाशिम यांचे कार्यालयातील फलकावर.
(४) पंचायत समिती, कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड व वाशिम यांचे कार्यालयातील फलकावर.
या आदेशाच्या मसुद्यावर कुणाचीही हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची सविस्तर लेखी निवेदने किंवा हरकती जिल्हाधिकारी, वाशिम यांच्याकडे दिनांक २१ जुलै पर्यंत सादर कराव्यात. उपरोक्त तारखेनंतर जिल्हाधिकारी, वाशिम यांच्याकडे आलेली कोणतीही निवेदने, हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी या प्रारूप प्रभाग रचनेचे अवलोकन करून, आवश्यकतेनुसार आपल्या हरकती किंवा सूचना वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर