Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, July 18, 2025

देऊरवाडी च्या धीरज आडे ची गगन भरारी.. मानोरा तालुक्यातून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करणारा ठरला पहिला उमेदवार

मानोरा :-- तालुक्यातील देवुरवाडी निवासी सुनील काळूराम आडे या अति अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द व चिकाटीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नर्सिंग अधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण करून मानोरा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
 केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाची अधिकारी पदाची परीक्षा पास होण्यासाठी राज्यातील लक्षाधी तरुण अनेक वर्षांपासून महागड्या क्लासेस लावून परीक्षेमध्ये यश मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना नर्सिंग परीक्षा पास होताच आधी राज्य शासनाची नर्सिंग स्टाफ पदी नेमणूक झालेल्या धीरज सुनील आडे या विद्यार्थ्याने येथेच न थांबता कुठल्याही क्लास शिवाय केंद्रीय लोकसेवा आयोगाने नर्सिंग अधिकारी या पदाच्या घेतलेल्या परीक्षेत यश मिळवून मानोरा तालुक्यातून केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत पहिला येण्याचा मान पटकावून मागास तालुक्याची ओळख आपल्या प्रतिभेच्या बळावर संपूर्ण देशात निर्माण केली आहे.
 धीरज आडे यांच्याकडे वडीलोपार्जित केवळ दीड एकर शेत शिवार असून अपार कष्ट करून त्यांचे वडील सुनील आडे यांनी त्यांची दोन्ही मुले मोठा सुरज व लहाना धीरज यांच्या शिक्षणासाठी कुठलीही कमी पडू दिली नाही.
तालुक्यातील देऊरवाडी येथे धीरज आडे यांची चौथीपर्यंत शिक्षण झाले पुढील शिक्षण त्यांनी मानोरा शहरातील रवींद्रनाथ टागोर विद्यालयात माध्यमिक विद्यालयापर्यंत घेतले. अमरावती येथे उच्च माध्यमिक शिक्षण घेत असतानाच धीरज आडे याने वैद्यकीय पूर्व परीक्षेची तयारी केली. डॉक्टर होण्याच्या संधीने हुलकावणी दिल्यावर हार न मानता पुण्यातील नामांकित ससून सर्वोपचार रुग्णालयात धीरजणे नर्सिंग विषयात २०२२-०२३ यावर्षी  पदवी प्राप्त केली.
पुण्यातील शिक्षणा दरम्यान लहान भावाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने मोठा भाऊ सुरज आणि यांनी तीन वर्षे खाजगी कंपनीत नोकरी करून धीरजच्या शिक्षणात आई-वडिलांसमवेत हातभार लावून बंधू ऋण फेडल्याची माहिती पुढे येत आहे.
आई-वडिलांचे शेतातील काबाडकष्ट आपल्यासाठी भाऊ सुद्धा कष्ट उपसत असल्याचे जाणीव ठेवून संघ लोकसेवा आयोगाद्वारा आयोजित 'ब' वर्ग अधिकारी पदाची तयारी तालुक्यातील पोहरादेवी येथे नर्सिंग स्टाफ म्हणून कार्यरत असताना धीरजणे करून लोकसेवा आयोगाच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळातील नर्सिंग ऑफिसर च्या पदाला गवसणी घालून आई-वडील, भाऊ आणि गुरुजनांच्या अपेक्षांना वास्तवात उतरविल्याने धीरज आडे यांचे संपूर्ण तालुका वाशियांकडून कौतुक केले जात आहे.


No comments:

Post a Comment

फॉलोअर