Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, July 30, 2025

"मांसाहारी दूध : भारत-अमेरिका व्यापार करारातील अडथळा" या विषयावर दिग्रस येथे व्याख्यान

दिग्रस (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस):
स्व. प्रा. अनिल विठ्ठलराव पाठक स्मृती उपक्रमांतर्गत
बापूरावजी बुटले कला, नारायणराव भट वाणिज्य व बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालय, दिग्रस द्वारा गुरुवार दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात "मांसाहारी दूध : भारत-अमेरिका व्यापार करारातील मुख्य अडथळा" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या देशभरात 'मांसाहारी दूध' या संकल्पनेवर विविध स्तरांवर चर्चा सुरू असून, भारतीय दुग्धउद्योग, धार्मिक आस्थापना आणि आंतरराष्ट्रीय व्यापार नितीवर याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर या विषयावर सखोल अभ्यास व विचारमंथन होणार आहे. महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य, पट्टीचे वक्ते, इतिहास आणि राज्यशास्त्राचे जाणते प्राध्यापक सुधीर पाठक हा विषय उपस्थितांसमोर मांडणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार बंग (अध्यक्ष, डि.एल.एस.पी. मंडळ) राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून श्याम महिंदे (पाटील), डॉ. अमय पाटील व प्राचार्य डॉ. अरविंद लाडोळे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात पॉवर पॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून विषय मांडण्यात येणार असून विद्यार्थ्यांसह सर्व अभ्यासक, शिक्षकवृंद आणि नागरिकांनी या महत्त्वपूर्ण चर्चासत्राला उपस्थित राहावे, असे आवाहन सायन्स क्लब तर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर