मानोरा:--- (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
तहसीलदार तथा पोलीस निरीक्षक यांना बंजारा समाजातील अध्यात्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नागरिकांच्या वतीने आज संभाव्य मोर्चा संदर्भात निवेदन देण्यात आले.१९१८ च्या हैदराबाद गॅझेटनुसार महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाज हा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट होता. देशाच्या सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांनी या गॅझेटला ऐतिहासिक शासकीय पुरावा मान्यता दिलेली आहे.संत तपस्वी धर्मगुरू रामराव महाराज यांनी आरक्षणाचा मुद्दा वेळोवेळी शासनाकडे आंदोलनाची भूमिकेतून माडत अनेक वेळा पंतप्रधान सह मुख्यमंत्री यांना भेटून समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची पूर्ती करण्यासाठी दि १७/९/२०२५ रोजी तहसील कार्यालय मानोरा येथे संजय महाराज यांच्या नेतृत्वात बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. तसे निवेदन तहसील व पोलीस प्रशासनाला आज देण्यात आले आहे.
ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, अशी मागणी समाजाने मागील अनेक दशकांपासून सातत्याने केली आहे.
सदर १९१८ च्या हैदराबाद गॅझेटनुसार आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांमध्ये बंजारा समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा या राज्यांशी रोटी-बेटी-बोटी व्यवहार असून, सामाजिक व सांस्कृतिक नातेसंबंध दृढ आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील बंजारा समाज आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटकातील बंजारा समाज हे एकाच वंशाचे, सगे-सोयरे मानले जातात.
वरील सर्व गोष्टींचा विचार करून, महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजास देखील आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, यासाठी भारत सरकार यांना शिफारस करण्यात यावे अन्यथा उपरोक्त न्याय मागणीसाठी राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याची प्रतिक्रिया निवेदनकर्त्यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली .
संभाव्य आंदोलनाचे निवेदन प्रशासनाला देतेवेळी संजय महाराज, रमेश महाराज, गोर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल चव्हाण, तालुका अध्यक्ष सुनील राठोड, माजी सरपंच दिलीप चव्हाण,शेतकरी नेते मनोहर
राठोड, माजी पंचायत समिती सदस्य अभिषेक चव्हाण, राष्ट्रीय बंजारा परिषद श्याम राठोड,राष्ट्रीय बंजारा परिषद वसंतराव राठोड,विशाल राठोड, धीरज राठोड,रोशन चव्हाण,अरविंद चव्हाण,
बी टी चव्हाण,पवन राठोड ,
किशोर नाईक गिर्डा,मधुसूदन राठोड,नितीन राठोड,विनोद चव्हाण,मखराम पवार,भानुदास जाधव,रामनाथ राठोड,
काशीराम राठोड,आशिष राठोड,रमेश पवार ,किशोर राठोड,रामराव चव्हाण,नेमीचंद राठोड,प्रकाश राठोड,बाळू राठोड,गणेश जाधव, महेश राठोड आदींची उपस्थिती होती.
###
*गोर सेना ह्या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी मानोरा शहर व तालुक्यातील संपूर्ण तांडे पिंजून काढून मोठी जनजागृती करीत आहे व यापुढील या मागणीसाठीचे सर्व आंदोलने यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेत असल्याची प्रतिक्रिया संघटना पदाधिकारी गोपाल चव्हाण यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.*
फोटो:----
No comments:
Post a Comment