Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, September 25, 2025

अमरावती विभागातील ग्रंथालय सेवकांचा अभिमान –प्रभाकर घुगे यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषदेवर निवड

वाशिम : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
जिल्हा ग्रंथालय संघ वाशिमचे प्रमुख कार्यवाह तसेच विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र माननीय प्रभाकर घुगे यांची महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषदेवर निवड झाली आहे.

या निवडीमुळे अमरावती विभागातील तसेच वाशिम जिल्ह्यातील ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवकांमध्ये मोठा आनंदाचा माहोल निर्माण झाला असून विविध स्तरांतून घुगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही निवड अमरावती विभाग व वाशिम जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

राज्य ग्रंथालय परिषद ही महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय चळवळीत सर्वात उच्च व महत्त्वाची समिती असून या समितीवर दोन मंत्री, आमदार, अवर सचिव, शिक्षण व माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सचिव तसेच पदसिद्ध सदस्य मिळून एकूण २० मान्यवर सदस्य असतात. ग्रंथालय चळवळीतील धोरणनिर्मिती, नियम व नियमन, तसेच शासनाच्या योजनांमध्ये सहकार्य करणे हे या समितीचे प्रमुख कार्य आहे.

गेल्या ३५ वर्षांपासून ग्रंथालय चळवळीच्या कार्यात सातत्याने योगदान देणारे, मनमिळावू आणि कार्यकर्त्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे प्रभाकर घुगे यांची या उच्च समितीवर झालेली निवड वाशिम जिल्हा आणि अमरावती विभागासाठी मोठा सन्मान असल्याचे मत ग्रंथालय सेवक व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर