दिग्रस : (सुरेश चिरडे)
नगर परिषद दिग्रसच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची चिठ्ठी आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नगर परिषद सभागृहात जाहीर करण्यात आली. उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी नगर परिषद मुख्याधिकारी अतुल पंत, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे, माजी लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नागरिक व पत्रकार उपस्थित होते. लहान बालकांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण ठरविण्यात आले.
घोषित आरक्षणानुसार —
प्रभाग क्र. 1 : (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. 2 : (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. 3 : (अ) अनुसूचित जमाती महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. 4 : (अ) ना.मा.प्र.महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. 5 : (अ) अनुसूचित जाती, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 6 : (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. 7 : (अ) ना. मा.प्र.महिला, (ब) सर्वसाधारण महिला, (क) सर्वसाधारण
प्रभाग क्र. 8 : (अ) अनुसूचित जमाती, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 9 : (अ) ना. मा. प्र, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 10 : (अ) ना.मा. प्र., (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 11 : (अ) ना.मां.प्र., (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 12 : (अ) ना.मां.प्र. महिला, (ब) सर्वसाधारण
याप्रमाणे नगर परिषद दिग्रसच्या 12 प्रभागातून एकूण 25 नगरसेवक निवडून येणार असून यापैकी तब्बल 13 जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत.
याआधीच नगर परिषद अध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment