Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, October 12, 2025

धोकादायक अवस्थेतील विद्युत खांबे केव्हा बदलली जाणार. ? कारखेडा येथील नागरिकांच्या जीवाशी वीज वितरण कंपनी प्रशासनाचा खेळ.

मानोरा :--तालुक्यातील गव्हा उपविज केंद्रातून वीज पुरवठा होत असलेल्या कारखेडा या गावातील भरवस्तीतील वीजवाहक खांब जमिनीलगत मोठ्या प्रमाणात फुटल्याने हा तुटका खांब कधी कोसळेल हे सांगता येत नसल्यामुळे मोठा अपघात होऊन कोणाची जीवित व शारीरिक हानी झाल्यास त्याची जबाबदारी वीज वितरण कंपनी प्रशासन घेणार काय असा सवाल या धोकादाय वीजवाहक खांबामुळे उपस्थित होत आहे.
 स्थानिक गजानन देशमुख यांच्या पिठ गिरणी जवळ असलेला हा विजवाहक ठाम वार्ड क्रमांक दोन मध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने अनेक वर्षांपूर्वी रोवलेला आहे या खांबाची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून खाली जमिनीलगत आणि मध्यभागी या खांबाची मोठी झीज झालेली असून कुठल्याही क्षणी हा भरवस्तीतील खांब कोसळू शकतो अशा अवस्थेत सध्या हा विज वाहक खांब पोहोचलेला आहे.
 वस्तीत मध्यभागी आणि रहदारीच्या ठिकाणी असलेला हा विजवाहक खांब जर वीज कोसळला तर या अवजड खांबाच्या वजन आणि जिवंत वीज प्रवाहाने कुठलीही जीवित व शारीरिक, आर्थिक हाणी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल या झिजलेल्या वीज वितरण कंपनी प्रशासनाच्या मालकीच्या खांबामुळे निर्माण झालेली आहे.
तांड्यामध्ये सुद्धा भरवस्तीत एक लोखंडी वीज वाहक खांब मागील काही वर्षांपासून वाकलेला असून हा कधी धाराशाही होईल हे सांगता येत नसल्याने सिमेंट व लोखंडी खांब तातडीने बदलविण्यात न आल्यास मोठ्या हानीला स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत.


No comments:

Post a Comment

फॉलोअर