मानोरा:-- ( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत करण्यात येणारे विविध पायाभूत सोयी सुविधांचे कामे दर्जाहीन केली जात असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीच कबूल केल्याचे गत महिन्यात उपोषणाला बसलेल्या उपोषणार्थीच्या निवेदना द्वारे पुढे येत असून यामुळे संपूर्ण विभागाचीच शोभा होत असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील युवराज रंगराव राठोड हे २ ऑक्टोबर ह्या तारखेला कारली बोरव्हा नांदगाव ह्या रस्त्याच्या कामामध्ये कोट्यावधी रुपयाचे भ्रष्टाचार झाल्याचे सांगत उपोषणाला बसले असता तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून नेमणुकीला असलेल्या अधिकाऱ्याच्या मदतीने
उपविभागीय आणि शाखा अभियंत्यांनी उपोषणकर्त्याला उपरोक्त कामामध्ये कुठलीही अनियमितता झाले नसल्याचे धमकावून पत्र दिल्यामुळे असमाधानी झालेल्या उपोषणकर्त्यांनी येत्या २५ नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला आरंभ करणार असून भ्रष्टाचार करून उपरोक्त कामातील शासकीय निधी लाटणाऱ्या उपविभागीय, शाखा अभियंता आणि मध्यस्थी करणाऱ्या नायब तहसीलदारांवर फौजदारी कारवाई करण्याची व भ्रष्टाचारातील निधी वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
*कार्ली बोरव्हा नांदगव्हाण रस्त्याच्या दर्जेन्नती दरम्यान वापरण्यात आलेल्या निकृष्ट बांधकाम साहित्यामुळे काही काळातच रस्त्यावर मोठमोठाले खड्डे निर्माण झाल्याने या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनंता खोडे व शाखा अभियंता विवेक पवार त्यांच्यावर करून तालुक्यातील आसोला या गावाची नागरिक युवराज राठोड यांनी तहसील कार्यालय परिसरात उपोषण केले होते. उपोषण सोडवितांना सदरील कामात अनियमितता झाली असून एका महिन्याचे आत उपरोक्त गावात दरम्यान असलेल्या रस्ता व पॅचेसचे काम करून देण्याचे आश्वासन संबंधित विभागाकडून देण्यात आले असल्याची माहिती उपोषणार्थीने प्रस्तुत प्रतिनिधीला दिली .*
*काम करून मिळावे ह्या संबंधीच्या उपोषणाला एक महिण्यापेक्षा अधिकची कालावधी उलटूनही कुठलीच हालचाली होत नसल्याने अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंता यांनी कमिशन घेऊन आपापसात उपरोक्त रस्ता कामाच्या निधीची वाटणी करून घेतली असल्याचे गंभीर आरोप सुद्धा मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे.*
फोटो ---
No comments:
Post a Comment