वाशिम, दि. २९ डिसेंबर (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
जुन्या मोटार वाहनांवर ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (HSRP) लावण्यासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० अन्वये १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांवर ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी एचएसआरपी बसविणे अनिवार्य आहे. ही मुदत जवळ आल्याने नागरिकांनी तात्काळ नोंदणी करून अधिकृत प्लेट बसविण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
रस्ते सुरक्षा व वाहनांची ओळख पटविणे सोपे होणे, बनावटगिरी रोखणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एचएसआरपी अत्यावश्यक आहे. अनधिकृत पुरवठादारांकडून घेतलेल्या प्लेट्स अवैध मानल्या जातील व नियमभंग करणाऱ्या वाहनमालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
वाशिम जिल्ह्यासाठी Rosmerta Safety Systems Ltd. या अधिकृत संस्थेची नेमणूक करण्यात आली असून, नागरिकांनी एचएसआरपी बुकिंगसाठी अधिकृत संकेतस्थळ
https://mhhsrp.com
वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे सहाय्यक परिवहन अधिकारी संग्राम जगताप यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment