पोहरादेवी (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
बंजारा काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील श्री जगदंबा देवी मंदिरात सोमवार दि. १२ जानेवारी २०२६ रोजी थोर संत श्री सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेचे अध्यक्षस्थान धर्मगुरू व मुख्य पूजारी कबीरदास महाराज यांनी भूषविले.
यावेळी सभेला धर्मगुरू सुनील महाराज, गणेश जाधव (सरपंच), माणिक महाराज, ज्ञानेश्वर महाराज, विजय महाराज, महंत संतोष महाराज, सदगुण महाराज, सौ. चंदाबाई अमोल राठोड, अमोल चव्हाण (वसंतनगर), जाणूसिंग महाराज, देवराव महाराज, शेषराव राठोड, मोंटी राठोड, प्रा. लोभी राठोड, प्रा. जगदीश राठोड, प्रा. प्रकाश राठोड, ह. भ. प. विकास महाराज, मधुकर नाईक, अमोल चव्हाण, चंदन महाराज, खुशाल महाराज, जयचंद राठोड, करण राठोड, करण जाधव, अनिल महाराज, सुरेश महाराज, विष्णू आडे, विलास आडे, गणेश महाराज, उल्हास महाराज आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेमध्ये दि. ७ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये धार्मिक प्रबोधन, भजन, श्रीमद्भागवत कथा, श्री सेवालाल लीला ग्रंथ वाचन तसेच प्रसिद्ध कीर्तनकार पंकज पाल यांचे कीर्तन आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कलश यात्रा, पालणा गीत, भोगविधी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असून या दिवशी जयंती महोत्सवाची सांगता होणार आहे.
श्री सेवालाल महाराज जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सहविचार सभेची सांगता शांततेत व उत्साहात झाली.
No comments:
Post a Comment