Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, February 15, 2026

चिखली येथे संत सेवालाल महाराज जयंती निमित्य धार्मिक कार्यक्रम उत्साहात. उद्या महापंगतीचे आयोजन

मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) : तालुक्यातील  चिखली येथे जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सात दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचा आज संत सेवालाल महाराज चरित्र ग्रंथ वाचनाच्या समाप्तीसह आणि जयंती उत्सव मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला.
गेल्या सात दिवसांपासून गावात दररोज प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येत होते. या प्रभात फेरीमध्ये भाविकांनी संत सेवालाल महाराजांच्या विविध लीलांवर आधारित भजने, गीते आणि त्यांच्या शिकवणीवर आधारित अभंग गात संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भारून टाकले होते.
जयंतीनिमित्त संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच गावाची सुंदर सजावट करण्यात आली होती. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या निमित्ताने संत सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित पवित्र ग्रंथाचे वाचन प्रेमसिंग महाराज चिखलीकर , डॉ रामराव राठोड यांनी केले. त्यांना विष्णू महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची साथ दिली.
संपूर्ण कार्यक्रमात ग्रामस्थ, भाविक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत सेवालाल महाराजांना अभिवादन केले व जयंती उत्सव उत्साहात साजरा केला. उद्या महापंगतीचे  आयोजन करण्यात आलेला आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर