कारंजा लाड (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) – दगडूजींग नाईक शिक्षण प्रसारक संस्था, लोहगाव, ता. कारंजा जि. वाशिम व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शेतकरी निवास, कारंजा लाड, जि. वाशिम येथे पार पडणार आहे.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन कारंजा–मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मा. श्रीमती सईताई डहाके यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मा. दत्तराज डहाके राहणार आहेत.
मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून TSPL Group & Company चे संचालक श्री. बालाजी आळंदीकर, श्री. गोपाल धारपवाड तसेच प्रा. महेंद्र खेडकर उपस्थित राहणार आहेत.
या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून पात्र उमेदवारांची थेट मुलाखत घेऊन नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
तरी जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थेचे सचिव दिनेश सुभाष राठोड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment