Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, March 1, 2026

बंजारा आरक्षणाबाबत न्या.तहलियानी यांच्याअध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत. तीन महिन्यात समिती शासनास अहवाल देणार————————————————


मुंबई,दि-१-बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत
समावेश करण्याच्या अनुषंगाने संर्वांगीण अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती  श्री.एम.एल. तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समितीत अध्यक्षासह सहा सदस्यांचा समावेश असल्याचा शासन निर्णय २७ फेब्रुवारी रोजी निर्गमित झाला आहे.
 समिती गठीत केल्याबद्दल महाराष्ट्र बंजारा आरक्षण कृती समिती,विविध संघटना आणि विविध आरक्षण समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार,आदिवासी विकास मंत्री अशोक उईके ,बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड ,राज्यमंत्री इंद्रनील नाईक आदींचे आभार मानले आहे.
या समितीत डॉ.सी.जे.सोनोवाल(मानववंश शास्त्रज्ञ),डॉ. शैलेशकुमार दारोकार(समाजशास्त्रज्ञ),अँड. नितीन गांगल(कायदेतज्ञ),डॉ.संदीपान गव्हाळे(विशेष अभ्यासक/उच्चस्तरीय अभ्यासक) हे सदस्य तर सदस्य सचिव हे आदिवसी संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणेचे सहसंचालक असतील, असे आदिवासी विभागाने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे.ही समिती विविध स्तरावर अभ्यास करून तीन महिन्यात शासनाला अहवाल सादर करणार आहे.
  ————————————————

No comments:

Post a Comment

फॉलोअर