Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, April 19, 2026

गलमगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

गलमगाव( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
मानोरा तालुक्यातील गलमगाव येथे काल दिनांक 14 एप्रिल ला भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गलमगाव ग्रामपंचातच्या वतीने भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. या वेळी गलमगाव चे सरपंच आशिष पाटील म्हणाले की आपण या वर्षी प्रथमच सार्वजनिक रित्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व गावकरी मिळून साजरी केली. या नंतर दर वर्षी आपण सर्व गावकरी मिळून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करू या. असे ते शेवटी म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोहरादेवीचे ज्येष्ठ समाज सेवक पांडुरंग मनवर आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान दिले. त्या मुळे देशातील जातीवाद आणि गरीब श्रीमंततील भेदभाव कमी होण्यास मदत मिळाली. प्रत्येक माणसाला मतदानाचा समान अधिकार दिला गेला. त्यामुळे या देशातला गरीब माणसंही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतो. असे ते शेवटी म्हणाले. या वेळी सामूहिक रित्या संविधान प्रस्तावांना वाचन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच आशिष पाटील, प्रसारम अंबुरे, मनोहर भंडारे, वसंता भंडारे, डोंगरे वरोली, दीपक भंडारे, सुभाष भंडारे , ताईबाई भंडारे , चंदाबाई भंडारे , कांताबाई भंडारे , सीताबाई कुरकुटे, विशाखा भंडारे , हगवणे बाई आदी मान्यवर उपस्थित होते.

Good

No comments:

Post a Comment

फॉलोअर