Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, March 14, 2025

दिग्रसला मिळाला "विद्यापीठस्तरीय विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळा" आयोजनाचा पहिला बहुमान !

 


दिग्रसला मिळाला "विद्यापीठस्तरीय विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळा" आयोजनाचा पहिला बहुमान  !

*सविता देशमुख महाविद्यालयाचा पुढाकार

*राळेगाव , सवना येथील महाविद्यालयांचाही योगदान

दिग्रस :- 

          दिग्रस येथील सविता देशमुख महाविद्यालय , राळेगाव येथील  कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग तसेच सवना येथील श्री विठ्ठल रुक्मिणी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच एक दिवसीय "विद्यापीठस्तरीय विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळेचे" यशस्वी आयोजन करण्यात आले होते . यावेळ जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते . 

          कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव वैशाली संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले . अध्यक्षस्थानी बाभूळगाव येथील प्राचार्य डॉ. हेमंत बारडकर , तर प्रमुख अतिथी म्हणून राळेगाव येथील प्राचार्य डॉ. भास्कर सावरकर , दिग्रस येथील प्राचार्य डॉ. दीपक कोटूरवार ,  दारव्हा येथील प्रभारी प्राचार्य डॉ. प्रिती ठाकरे आदी मान्यवर होते . 

          नवीन शैक्षणिक धोरण अर्थात एन. ई. पी. 2020 उद्बोधन कार्यशाळेची सुरुवात कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यानंतर विद्यापीठ-गीत सादर करून करण्यात आली . उद्घाटनीय सत्राचे अत्यंत उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. डॉ. गोल्डी जांभुळकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. टी. व्ही. कांबळे यांनी मानले . उद्घाटनानंतर लगेचच प्रथम तांत्रिक सत्र घेण्यात आले . या सत्राचा विषय 'भाषण व मुलाखत कौशल्य' हा होता. या सत्राचे अध्यक्ष प्रा. अविनाश फाळके हे होते , तर प्रमुख वक्ते बाभूळगाव येथील प्रा. डॉ. युवराज मानकर हे होते. या सत्रामध्ये प्रा. डॉ. युवराज मानकर यांनी विद्यार्थ्यांना भाषण व मुलाखत कौशल्य कसे असायला पाहिजे, याविषयी सखोल मार्गदर्शन केले . 

          द्वितीय तांत्रिक सत्राचा विषय 'प्रकल्प लेखन' हा होता. या सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. नासिर शेख तर प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. दीपक कोटूरवार हे होते . प्राचार्य डॉ. दीपक कोटूरवार यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प लेखन कसे करावे, संशोधनाविषयी लेख कसा लिहावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले .

           तृतीय सत्राचा विषय 'मानवी जीवनात योगाचे महत्त्व व भारतीय ज्ञान परंपरा' हा होता. या सत्राचे अध्यक्षस्थान सवना येथील प्रा.डॉ. रंजुताई मनवर यांनी भूषविले . प्रमुख वक्ते राळेगाव येथील प्राचार्य डॉ. भास्कर सावरकर व दारव्हा येथील प्रा. डॉ. पुरुषोत्तम बांडे हे होते. प्राचार्य डॉ. भास्कर सावरकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे तसेच व्यायामाचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे पटवून दिले . प्रा. डॉ. पुरुषोत्तम बांडे यांनी 'भारतीय ज्ञान परंपरा' विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.                                     

           समारोपीय सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भास्कर सावरकर , तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. दीपक कोटूरवार हे होते. उल्लेखनीय बाब म्हणजे , संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सर्व प्रथमच 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण , म्हणजे एनईपी 2020' यावर "विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळेचे" आयोजन करण्याचा बहुमान सविता  देशमुख महाविद्यालयाला प्राप्त झाला होता . 

          जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील पाच-पाच विद्यार्थी आणि एक प्राध्यापकाने  या उद्बोधन कार्यशाळेला हजेरी लावली होती . यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी कार्यशाळेविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले . शेवटी मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले . सदर एक दिवसीय कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी  आदींनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताद्वारे करण्यात आली .


No comments:

Post a Comment

फॉलोअर