Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, March 24, 2025

ग्रंथालय प्रश्न शासन दरबारी मांडणार – आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक*


वाशिम:( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानवाढ, वर्गबदल, तसेच नवीन ग्रंथालयांना मान्यता मिळण्यासाठी अनेक मागण्या प्रलंबित आहेत. शासनाने वेळोवेळी आश्वासने दिली असली तरी समाधानकारक अनुदान वाढ मिळालेली नाही. त्यामुळे हे प्रश्न शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनी केले.

 *संयुक्त वार्षिक अधिवेशन संपन्न* 

वाशिम जिल्हा ग्रंथालय संघाच्या 21 व्या वार्षिक अधिवेशन व अमरावती विभाग ग्रंथालय संघाच्या 24 व्या वार्षिक अधिवेशनाचा संयुक्त कार्यक्रम दिनांक 22 मार्च 2025 रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माननीय प्रभाकरराव घुगे होते.

 *ग्रंथालय क्षेत्रातील तज्ज्ञांची उपस्थिती* 

या कार्यक्रमास मराठवाडा विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, अमरावती विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, यवतमाळ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन, अकोला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल पाटील वानखडे, वाशिम जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, विभागीय ग्रंथालय निरीक्षक गजानन कुरवाडे, तसेच वाशिम जिल्हा ग्रंथालय निरीक्षक नरेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 *महत्वपूर्ण मार्गदर्शन व ठराव वाचन* 

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनी ग्रंथालयांच्या समस्यांवर सखोल विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात प्रभाकरराव घुगे यांनी ग्रंथालयांच्या समस्या आणि उपाययोजनांवर मार्गदर्शन केले तसेच अधिवेशनातील ठरावाचे वाचन केले.

सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी ग्रंथालय क्षेत्रातील अनुभव कथन केले. डॉ. राजेश पाटील यांनी ग्रंथालय व्यवस्थापनावर मार्गदर्शन करताना उत्कृष्ट उदाहरणे सादर केली. यावेळी प्राध्यापक कमलेश खिल्लारे (बुलढाणा) यांच्यासह अमरावती जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरेश मडावी, यवतमाळ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन, अकोला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल पाटील वानखडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

 *कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार* 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय धांडे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. सिताराम नालेगावकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुकिंदा महाले, मनोज काळे, सुभाष नालेगावकर, कपिल कांबळे, दीपक खंडारे, पुरुषोत्तम गंगावणे, प्रताप मोरे, सचिन दळवी, बिट्टू भालेराव, विलास कांबळे, बंडू इंगोले, सुखदेव लबडे, राजीव पांढरे, सिद्धार्थ लबडे, कल्याणी धर्माधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या अधिवेशनास अकोला, अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील अनेक ग्रंथालय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

फॉलोअर