मानोरा :-- (साप्ता.दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क ) ह्या पूर्णपणे कृषी उत्पन्नावर आधारित जीवनपद्धती असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना बँक प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे गुन्हेगार ठरविले जात असून फुलउमरी येथे असलेल्या सेंट्रल बँकेतील कर्मचाऱ्याने दिलेल्या कर्ज नसल्याच्या दाखल्याला एचडीएफसी बँकेने नाकारून संबंधित शेतकऱ्यांवरच फसवणूक केल्याचा आरोप करून कर्जासाठी धावा धाव करणाऱ्या शेतकऱ्याला आता स्वतः निरपराध असल्यासाठी धावाधाव करण्याची पाळी आणलेली असल्याची व्यथा नोड्यूज मिळालेल्या कैलास शिवदत्त राठोड या शेतकऱ्यावर आली आहे.
कैलास शिवदत्त राठोड ह्या पोहरादेवी येथील शेतकऱ्याकडे स्वतःच्या व वडील शिवदत्त महादेव राठोड यांच्या नावे असलेल्या शेतशिवारावर पुढील खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले कर्ज घेण्यासाठी लागणारे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र फुलुंब्री येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत केले असता या शाखेतीलच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने शिक्का व सही असलेले तथा तारीख नसलेले उपरोक्त दोन्ही शेतकऱ्यांच्या नावाने नोड्यूज दिले होते.
सदरील नोड्यूज कैलास राठोड या शेतकऱ्याने एचडीएफसी बँकेत सादर केले असता एचडीएफसी प्रशासनाने पडताळणी केली असता उपरोक्त नोड्यूज वर संशय घेऊन संबंधित शेतकऱ्यांवर बँकेची फसवणूक केल्याचा आळ घेतल्याची माहिती कैलास राठोड या शेतकऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे व्यक्त केली.
फुलूंब्री येथील शाखाधिकारी हे सुद्धा सदरील नोड्यूस मी नसताना माझ्या आधीच्या कार्यकाळात दिले गेले असल्याने जबाबदारी घ्यायला तयार नाहीत व सदरील शेतकऱ्याने नोड्यूस याच बँकेतून घेतले असून त्यासाठी रीतसर अर्ज दिल्याची फिर्याद शाखाधिकारी सेंट्रल बँकेच्या शाखाधिकारी यांच्याकडे केली असता ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याची हकीकत दोन्ही बँकेच्या कात्रीत अडकलेल्या व कर्जासाठी गरजू असलेल्या शेतकऱ्याने प्रस्तुत वृत्तपत्राला दिली.
फोटो---
No comments:
Post a Comment