दिग्रस :-
दिग्रस येथील ताकपीरे गुरूजी सार्वजनिक वाचनालयात जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ अहिल्यामाता होळकर, सावित्रीमाता फुले यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा डॉ अर्पणा पाटील व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे शालिनी गावंडे , प्रिती शाक्यवार यांच्या हस्ते माल्यर्पण करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ अर्पणा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शालिनी गावंडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगुन त्यांना पुढील काळात होणाऱ्या परिक्षेसाठी मार्गदर्शन केले .
ग्रंथपाल जितेंद्र चौधरी , लिपिक गौरव दुधे विद्यार्थी पवन चव्हाण, रामेश्वर इंगळे, प्रदीप बळी, स्वप्निल आडे, रंजित भगत,युगेन राठोड,लखन आडे, श्रीधर राठोड, शेखर पवार, सुमित पवार, भागवत साबळे, गौरव साबळे, शेख अलबक्ष, विद्यार्थीनी सुकिता लोखंडे, निकिता लोखंडे , प्रिती शाक्यवार ,अमिशा सुकळकर , रविना चव्हाण , रक्षणा पवार, सुहासिनी चव्हाण , रविना पवार आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुकिता लोखंडे हिने केले तर सूत्रसंचालन निकिता लोखंडे यांनी केले आभार प्रदर्शन रंजित भगत यांनी केले . यावेळी असंख्य वाचक उपस्थित होते .
No comments:
Post a Comment