Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, March 18, 2025

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी प्रकाश बाबूचिंग राठोड यांची तक्रार*


मानोरा : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कुपटा ते चोंडी रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रकाश बाबूचिंग राठोड यांनी केला आहे. त्यांनी कार्यकारी अभियंता वाशिम आणि संबंधित कंत्राटदार यांनी संगणमत करून इस्टिमेटप्रमाणे काम न करता निकृष्ट दर्जाचे काम केले असून, शासनाचा निधी हडप केल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणी त्यांनी माननीय आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालय, अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच, या तक्रारीच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उपसचिव ग्रामीण विकास मंत्रालय, जिल्हाधिकारी वाशिम आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता वाशिम यांना पाठविण्यात आल्या आहेत.

तक्रारीत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

या तक्रारीवर प्रशासन काय भूमिका घेणार आणि कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर