Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, March 17, 2025

गुरुवारपासून दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव’;ग्रंथदिंडी, व्याख्यान, कविसंमेलनासह भरगच्च कार्यक्रम


       वाशिम, दि. १७ मार्च (साप्ता. दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विभागीय ग्रंथालय, वाशिम येथे  दि. २० आणि दि.२१ मार्च २०२५ रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

       दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसह, ग्रंथदिंडी, परिसंवाद, कवी संमेलन,  आदी भरगच्च कार्यक्रमांची  साहित्य रसिक व ग्रंथप्रेमींना खास मेजवानी असणार आहे. या मेजवानीचा ग्रंथप्रेमी, साहित्य रसिक, नागरिकांनी सहभागी होऊन साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी केले आहे. 

              कार्यक्रमाची रूपरेषा -  ग्रंथोत्सवाचा प्रारंभ गुरुवार दि. २० रोजी सकाळी ९ वाजता  ग्रंथदिंडीने होणार, सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे.
 उद्घाटन सत्रानंतर दुपारी १ ते २ वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यात ग्रंथालयाचे योगदान व ‘व्यक्तीमत्व विकासाचे पैलू’ या विषयावर सादरीकरण होणार आहे. दुपारी ३ ते ५  वाजता ‘काव्यवाचनाचे आयोजन करण्यात आले आहे.


          दुसरा दिवशी शुक्रवार दि. २१ मार्च रोजी सकाळी १० ते ११.३० पर्यंत ‘कथाकथन' ११.३० ते १ वाजेपर्यंत ग्रंथ वाचनाचे फायदे या विषयावर परिसंवाद, दुपारी २ ते ४  सांस्कृतिक कार्यक्रम व त्यानंतर समारोप होणार आहे.

      या सर्व कार्यक्रमांना जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून ग्रंथप्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीने केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर