Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, March 17, 2025

दिग्रस शिवसेनेतर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी


दिग्रस: -
           दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शिवसेना पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस येथे साजरी करण्यात आली. यावेळी बहुसंख्येने शिवप्रेमी बांधव उपस्थित होते. 
           सकाळी १०.३० वाजता चे सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा उभारून तिथे विधिवत पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करून सर्व शिवसैनिकांनी महाराजांना सामूहिक अभिवादन केले. तर नंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करण्यात आला व प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. युवासेनेचे अनिरुद्ध राठोड यांनी केलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून गेली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संजय कुकडी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर