Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, March 14, 2025

विहिरीत पडलेल्या बिबट्याला* *वन विभागाची यशस्वी मदत!* * *हातोली येथील शेतशिवारात वन्यजीव बचाव ऑपरेशन राबवून सुखरूप सुटका*


 *

 मानोरा, *साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क – हातोली (ता. मनोरा) येथील एका शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाने अत्यंत शिस्तबद्ध व तातडीच्या कारवाईने सुखरूप सुटका केली. या धडाकेबाज बचाव मोहिमेत वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अतिशय समन्वयाने काम करत या वन्यप्राण्याला कोणतीही इजा न होता जंगलात सोडले.

 *घटनेचा थरार* 

हातोली गावातील शेतकरी सकाळी त्यांच्या शेतावर गेले असता, विहिरीत बिबट्या पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. बिबट्याच्या डरकाळ्यांमुळे गावकरी घाबरले. त्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली. यानंतर वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले.

 *वन विभागाची तातडीची कारवाई* 

वनसंरक्षक वाशिम मा. अभिजित वायकोस (भा. व. से.), वनसंरक्षक मा. शरयू रुद्रवार, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) मनोरा पी. बी. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन राबवण्यात आले.

RRU वाशिमच्या तुकडीसह मानोरा वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी समन्वय साधत बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जाळी व दोरींच्या साहाय्याने विशेष यंत्रणा तयार केली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

 *कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग* 

या मोहिमेत RRU टीमचे शेख मुखबीर, शेख गुलाब, जलद कृती दल प्रमुख, गिरीश डांगे, संदीप राठोड, किरण, तेजस, अश्विन राठोड, गिराम 92 तसेच फिरते पथक मंगळ पेटीएम आर आर यु वासिम टीम वनपरिक्षेत्र राधे कारंजा मधील वन कर्मचारी व वनपरिक्षेत्र प्रादेशिक मानोरा मधील आरबी सोनवणे वनपाल मानोरा , एस एस पी राठोड वनपाल पालोदी ,एम बी शिरसाट वनपाल गिरोली ,व्ही बी चतुरकर वनपाल शेंदोणा, वनरक्षक सीमा पांडे व इतर वनकर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 *बिबट्याला सुरक्षित जंगलात सोडले* 

संपूर्ण वैद्यकीय तपासणीनंतर आणि वन विभागाच्या नियमानुसार बिबट्याला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले.

 *गावकऱ्यांची वन विभागाच्या* *कार्यवाहीवर कौतुकाची थाप* 
 
या धाडसी आणि नियोजनबद्ध बचाव कार्याबद्दल गावकऱ्यांनी वन विभागाचे आभार मानले. वन्यजीव संरक्षणासाठी अशा तत्परतेने आणि संवेदनशीलतेने काम करण्याच्या वन विभागाच्या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


---

No comments:

Post a Comment

फॉलोअर