स्थानिक बापूरावजी बुटले कला, नारायणराव भट वाणिज्य व बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याच कार्यक्रमात प्रमुख अतिथी आपले मनोगत व्यक्त करताना दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप मेहता म्हणाले की नवसंकल्पनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रोजगार निर्मिती व स्वयंरोजगार चा मार्ग शोधून आपली आर्थिक उन्नती करून घ्यावी. ते पुढे म्हणाले की आपल्या भविष्यात यश प्राप्त करण्याकरिता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून विविध समस्यावर उपाय शोधले पाहिजे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या या नॅक अ दर्जाचे मानांकन प्राप्त महाविद्यालयातून आपण पदवी घेतलेली आहे तेव्हा निश्चितच पुढील भविष्यात एक जबाबदार नागरिक म्हणून देशाप्रती व समाज प्रतीचे आपले कर्तव्य आपण पार पाडावे असे आव्हाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अजय लाड,संचालक, नवपोक्रम, नवसंशोधन व साहचार्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती यांनी आपल्या मार्गदर्शनात विविध सामाजिक समस्यावर वैज्ञानिक दृष्टी बाळगून चिंतन व मनन करून उपाय शोधण्याचे आवाहन उपस्थित पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री विजयकुमार बंग यांनी भूषविले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री श्याम पाटील , त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद लाडोळे, आयोजन समितीचे समन्वयक प्रा. डॉ. संजय देवस्थळे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदवी वर्गाच्या व एम. एस. सी. वनस्पतीशात्र व एम. ए. मराठी या पदवीत्तर वर्गाच्या एकंदर 75 विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व पदवी प्राप्त विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.नरेंद्र मनवर, प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय देवस्थळे , आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रुपेश कऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता प्रा.डॉ. प्रवीण चांडक, प्रा. डॉ. मनोज भगत, डॉ. परेश लाचुरे, धनंजय नेमाडे, सुमंगल जगताप, देविदास मडावी, अनुप ढोरे, प्रेम राठोड, सागर शिकारे, श्रीमती वनिता भगत, श्रीमती मालाबाई रणखांब, सौ निमकर, आदित्य भोकरे, शुभम इंगोले यांनी अथक परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment