Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, March 31, 2025

इस्लाम धर्मात हिंसा , रक्तपात , जातीभेद , द्वेषाला मुळीच थारा नाही* --- मौलाना काजी अबू जफर----------------------- ----------------------------------------* दिग्रस येथे ईद-उल-फित्र उत्साहात साजरी* हिंदू-मुस्लीम बांधवांच्या एकमेकांना शुभेच्छा

दिग्रस -(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
          अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी आपल्या अनुयायीना सक्त ताकीद केली की जर तुम्ही समुद्र , तलाव किंवा वाहत्या नदीच्या जवळ असाल व पाण्याचा अपव्यय करत असाल तर खबरदार ! कारण अल्लाहच्या दरबारात तुम्हाला पाण्याच्या एकेक थेंबाचा हिशोब द्यावा लागेल . 
          आता या गोष्टीवरूनच लक्षात येते की जो धर्म पाण्याचा एक थेंबसुद्धा वाया घालण्यापासून परावृत्त करतो तो मानवजातीला त्रास देण्याची शिकवण कशी देईल . म्हणूनच आमचा दृढ विश्वास आहे की इस्लाम धर्मात हिंसा , रक्तपात , जातीभेद , द्वेषाला मुळीच थारा नाही , असे मत मौलाना काजी अबू जफर यांनी व्यक्त केले .
          दिग्रस येथील धावंडा नदी तीरावरील ईदगाहवर "ईद-उल-फित्र" अर्थात रमजान ईदची विशेष नमाज अदा केल्यानंतर ते विशाल जनसागराला उद्देशून बोलत होते . सकाळी साडे नऊ वाजता ईदगाहवर विशेष नमाज अदा करण्यात आली . तद्नंतर खुत्बा , फातेहा ख्वानी ,  सलाम तसेच देशाच्या ऐक्य , अखंडता व प्रगतीसाठी सामूहिक दुआ-प्रार्थना करण्यात आली . मुस्लीम बांधवांनी एकमेकांना गळाभेट करून ईदच्या शुभेच्छा दिल्या .
          शहरातील सर्व मस्जिदिंमध्ये देखील सकाळीच ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली . सर्वात शेवटी ईदगाहवर नमाज ठेवण्यात आली होती . शहरातील विविध भागांतील मुस्लीम बांधवांसह शहर लगतच्या ग्रामीण भागातील असंख्य मुस्लीम बांधव या ठिकाणी नमाजसाठी एकत्रित झाले होते . 
           काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे , जिल्हा सरचिटणीस राजेंद्रसिंह चौहान , तालुकाध्यक्ष शंकर जाधव , भारत देशमुख , माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे , माजी नगराध्यक्ष शाम पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश तायडे , शिवसेना-उबाठा शहर प्रमुख राहुल देशपांडे , माजी उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे , केतन रत्नपारखी , हर्षिल शाह , राहुल वानखडे , सुदर्शन हसबे , आत्माचे तालुकाध्यक्ष रामभाऊ मारशेटवार , राजेंद्र शेळके , संतोष निकम , दत्ता वानखडे , प्रज्योत अरगडे , माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग , ऍड सुधाकर जाधव आदींनी प्रत्यक्ष भेट घेऊन मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या .
          दिग्रसचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे , पोलीस उपनिरीक्षक प्रसेनजीत जाधव , उपपोलीस निरीक्षक महेश देशमुख , फतेहसिंग साबळे , सुनील राठोड , अनिल मदने , सचिन राऊत , श्रावण राऊत व पोलीस स्टेशनच्या संपूर्ण स्टाफतर्फे मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या . दिग्रस येथे ईद शांततेत पार पडली असून पोलीस विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते . 

*फोटो*
1} दिग्रस येथे ईदगाहवर नमाज अदा करतांना मुस्लीम बांधव
2} पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे मौलाना काजी अबू जफर यांना शुभेच्छा देतांना . यावेळी इतर अधिकारी , कर्मचारी व मुस्लीम बांधव उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

फॉलोअर