मानोरा :-- तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी ला मराठवाड्यातील शक्तीपीठ रेणुका मातेच्या माहूर येथील देवस्थानाला जोडण्याची मागणी महागाव तालुक्यातील शेतकरी नेत्यांनी देशाचे राष्ट्रीय राजमार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे तीन वर्षांपूर्वी केली होती. लेखी निवेदन दिलेल्या शेतकऱ्यांना सदरील प्रस्ताव व निवेदनाचा विसर पडला मात्र अचानक हा रस्ता एमएसआय डीसी अंतर्गत बांधले जात असल्याची निविदा प्रकाशित होताच विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी व भाविकांना गडकरींनी सुखद धक्का दिल्याची माहिती उपरोक्त रस्त्याची मागणी करणारे शेतकरी नेते मनीष जाधव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.
तीर्थक्षेत्र पोहरादेवी ला बंजारा समाजाचे विशेष आस्थेचे स्थान असल्याने त्या तीर्थक्षेत्राला येण्यासाठी तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यातील नागरिक तीर्थक्षेत्र माहूरगड काळी दौलत वागद इजारा बोरी, सिंगद ह्या अरुंद व घाटमाथ्याच्या रस्त्याने येत असल्याने श्रद्धाळूंना मोठ्या अडचणीचा सामना दरवर्षी करावा लागत असल्याची बाळ शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते मनीष जाधव यांनी देशाचे राजमार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची नोव्हेंबर ०२२ मध्ये भेट घेऊन या संदर्भात लेखी निवेदन दिले होते.
शेतकरी नेते मनीष जाधव यांनी देशाचे राष्ट्रीय राजमार्ग मंत्री ना.गडकरी यांना दिलेल्या निवेदनाची दखल त्यांनी घेतल्याने ह्या पोहरादेवी व माहूरला जोडणाऱ्या ६० कि.मी. रस्त्याचे पुलाचे बांधकामा सहित रुंदीकरण होणार असून ह्या रस्त्याच्या निर्मितीवर तब्बल २१२८४०३७७०/ ( दोनशे बारा कोटी चौऱ्यांशी लक्ष तीन हजार सातशे सत्तर रुपये) खर्च होणार असल्याच्या निविदा प्रकाशित झाल्याने गडकरी साहेबांनी तीर्थक्षेत्र पोहरादेवी आणि माहूर या तीर्थक्षेत्रांचे महत्त्व ओळखून आपल्या निवेदनाची दखल घेतल्याने ह्या भागातील नागरिकांचे व दक्षिणेतील राज्यातील नागरिकांना सुद्धा पोहरादेवीला येण्याचा मार्ग सुकर होणार असल्याचे आनंद व्यक्त केले.
बॉक्स.--
*ना.नितीन दादा म्हणजे पक्का वादा*
*शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते मनीष जाधव यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा शंकरपाटाचा प्रश्न सुटावा यासाठी ना. गडकरींची तीन वर्षांपूर्वी नागपूर येथे शेतकरी सहकाऱ्यांसमवेत घेतलेल्या भेटीदरम्यान पोहरादेवी ते माहूर हा रस्ता सिंगद, बोरी वागद, काळी मार्गे करण्याबाबत विनंती केली होती ज्याची दखल घेऊन ना.गडकरी यांनी राज्य शासनाच्या एमएसआयडीसी अंतर्गत मंजूर करून घेतला असून या रस्त्याच्या विकासाकरिता तब्बल कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यासमवेतच दक्षिणेकडील राज्ये या निर्माणकार्यामूळे अधिक जवळ येणार असल्याचे मनोगत मनीष जाधव यांनी व्यक्त करून केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.*
फोटो---
No comments:
Post a Comment