मानोरा -- शहरातील मुंगसाजी नगर येथील रहिवासी शाहू पाटील यांचा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांचेकडून पालकां समवेत नुकताच वडिलोपार्जित गावात सत्कार करण्यात आला.
शाहू रवींद्र जगताप यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मानोरा शहरातील शाळेत झालेले आहे. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी नगर येथे खाजगी शिक्षण संस्थेत अकॅडमिक शिक्षण घेत असताना भारतीय नाविक दलाची चाचणी परीक्षा उत्तीर्ण केली होती ज्या आधारे त्यांची भारतीय नाविक दलामध्ये निवड होऊन नुकताच शाहू पाटील यांनी ओरिसा येथील आयएनएस चिल्का ह्या नाविक प्रशिक्षण देणाऱ्या लढाऊ जहाजावर आपले नाविक सैनिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
भारतीय तटरक्षक दलामध्ये निवड झालेल्या शाहू राहुल जगताप यांचा त्यांच्या आई-वडिलांसमवेत राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड यांच्या हस्ते त्यांच्या मूळ गावी पिंपळखुटा येथे सत्कार करण्यात आला.मानोरा शहरात जडणघडण झालेल्या शाहू पाटील यांचा सन्मान करण्याचा आग्रह स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शाम राठोड यांच्याकडून करण्यात आला होता ज्याची दखल मंत्री राठोड यांनी घेऊन पालकांसमवेत नाविक जवान शाहू पाटील यांचा त्यांच्या मूळ गावी जाऊन ग्रामस्थांच्या उपस्थितीत सन्मान केला.
स्थलसेना,जलसेना आणि वायू सेनेच्या शूर शिपायांमुळे हा देश सुरक्षित असल्यामुळे देश सेवेसाठी जात असलेल्या शाहू पाटील या जवानाचा महाराष्ट्र शासनाला सार्थ अभिमान असून शाहू पाटील यांनी निवडलेल्या क्षेत्राडडे राज्यातील अधिकाधिक तरुणांनी वळण्याचा सल्ला ना. राठोड यांनी यावेळी दिला.
No comments:
Post a Comment