Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, April 4, 2025

बंजारा विरासत वास्तू ठरणार पर्यटकासाठी आकर्षण रामनवमीच्या पर्वावर 5 एप्रिलपासून पर्यटकसाठी खुले


मानोरा:- (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क ) तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा समाजाची संस्कृतीचे संवर्धन होऊन तिचे दर्शन सर्वांना घडावे, याकरिता महाराष्ट्र शासनाने नंगारा आकाराची भव्यदिव्य अशी वास्तू साकारली आहे.  ज्यामध्ये बंजारा समाजाचा सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिप्रेक्षातून बहुआयामी असा वारसा देखावे, चलचित्र आणि संगीताच्या संयोजनातून डोळ्यासमोर उभा केला आहे. ज्याचे लोकार्पण भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी गतवर्षी केले होते. परंतू काही तांत्रिक अडचणीमुळे तो सामान्य नागरिकांकरिता खुला करण्यात आला नव्हता. परंतू आता रामनवमीच्या पावन पर्वावर दि. ५ एप्रिल पासून ही वास्तू सर्वसामान्य नागरिकांकरिता खुली करण्यात येणार आहे. 
       बंजारा विरासत या म्युझियमची पाहणी करण्यासाठी एकूण दोन तासांचा अवधी लागणार असून प्रत्येक दर्शकाला ऑडिओ गाईड म्हणून हेडफोन देण्यात येणार आहे. ज्यामध्ये पर्यटक ज्या देखाव्यासमोर उभा आहे, त्या देखाव्याबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे.
  बंजारा शब्दाची उत्पत्ती, बंजारा समाजाचे ऐतिहासिक संदर्भ, बंजारा समाजातील न्यायव्यवस्था, धार्मिक अधिष्ठान, पेहराव, राजकीय परंपरा याचे दर्शन वेगवेगळ्या गॅलरी मधून घडते. भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि शीख यांच्या देखाव्यातून धार्मिक सलोख्याबाबत वास्तव चित्रण स्पष्ट होते आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर