Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, April 4, 2025

आमदार संजय मेश्राम यांच्या जन्मदिनी मानपत्र देऊन सन्मान तांडा सुधार समिती

नागपूर ( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
           बंजारा भटके विमुक्त व वंचितांच्या प्रश्नावर विधानसभेत गर्जना करणारे उच्चविद्याविभूषित आमदार मा. संजय मेश्राम साहेब यांचे त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीने सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले. मा. संजय मेश्राम यांची नुकतीच काँग्रेस पक्षाचे प्रतोद म्हणून नियुक्ती झाली असून विधानसभेच्या पंचायत राज समिती व अनुसूचित जाती जमाती समितीवर सुध्दा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर असलेले संजयजी मेश्राम हे IIT MUMBI या नामांकित संस्थेचे विद्यार्थी आहेत. सध्या यवतमाळ जिल्हा काँग्रेस पक्षाचे प्रभारी म्हणून नियुक्त झालेले आमदार संजय मेश्राम हे साधे सरळ असून अतिशय अभ्यासू आहेत. बंजारा भटके विमुक्तांचे अनेक आमदार सभागृहात असताना नाईक साहेब सभगृहवर एक ही प्रश्न उपस्थित करीत नाही.अशावेळी नागपूर हिवाळी अधिवेशन व मुंबई येथे पार पडलेल्या अधिवेशनात त्यांनी सलग नागपूर येथील महानायक वसंतराव नाईक यांच्या सभागृहाचा प्रश्न लावून धरला हे विशेष! कार्य कर्तृत्वामुळे व स्वभावामुळे ते जमिनीवर (ग्रास रुट) कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अखिल भारतीय तांडा सुधार समिती व भटके विमुक्त समाजाच्या वतीने त्यांचे सत्कार करून त्यांना भरभरून सदिच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित नामा बंजारा महासचिव तांडा सुधार समिती,  वरिष्ठ समाजसेवी प्रा.मोहन चव्हाण, डॉ सुभाष जाधव उपाध्यक्ष तांडा सुधार समिती, नायक हुकमचंद राठोड, राजेश महिद्रे, गनेश राठोड,  शेतकरी नेते मनोहर राठोड, सामाजसेवी ईश्वर जाधव,गुणवंत मोरे, दीपक नागपुरे, भारद्वाज सर, अनिल जाधव , रमणसिंग, राजू भाऊ रत्ने जिल्हाध्यक्ष नागपूर तांडा सुधार समिती, सामाजिक कार्यकर्ता धर्मेंद्र जाधव यांच्यासह अन्य समाज बांधव उपस्थित होते

No comments:

Post a Comment

फॉलोअर