मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज) तालुक्यातील पंचाळा फाट्यावर मेघा सोलर पावर कंपनी मुळे भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देऊन त्या कंपनीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला देऊन त्यांच्या मुलाबाळांना कंपनीत रोजगार देत कंपनीने या परिसरातील अतिरिक्त वनसंपदा नष्ट केल्याने त्यांच्यावर चौकशी करून दंड वसूल करून त्या परिसरात तेवढेच वृक्ष लावण्याची हमी घेण्याची मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार मानोरा तालुक्यातील मानोरा - दिग्रस या राष्ट्रीय महामार्गावरील पंचाळा फाट्यावर मेगा सोलर पावर कंपनीने गट नंबर १५६,१५७,१५८ या सन १९७७ - ७८ पासून पंचाळा येथील अनेक शेतकऱ्यांनी ही जमीन वाहीतीत काढलेली असून त्या शेतकऱ्याकडे ७/१३ च्या पेरेपत्रकावर त्यांच्या नावाची नोंद असून त्या शेतकऱ्यांनी शासनाकडे पट्ट्याची मागणी केलेली आहे.तसे पाठपुरावाही शासनाकडे चालू असताना अनधिकृत पणे या कंपनीने पंचाळा शिवारात शेकडो हेक्टर अतिक्रमणाची जमीन असताना वहितीत असलेल्याच जमिनीवर का सोलर प्लांट फाटले थाटले? "राहील त्याचा घर व वाहील त्याची शेती" या उप्तीप्रमाणे भूदान चळवळ विनोबा भावेने चालविली माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांनी कुळ कायद्याची जमिनी शेतकऱ्यांना दान दिली या सर्व शासन नियमाला बगल देत मेघा सोलर पावर कंपनी ने कुठल्या नियमाने या शेतकऱ्यांना भूमिहीन केले.ज्या अतिक्रमणीत जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कंपनीने वार्षिक मोबदला देत त्यांच्या मुलाबाळांना त्या कंपनीत रोजगार देऊन त्यांचा उदर निर्वाहाचा प्रश्न मिटवावा तसेच कंपनीने या परिसरातील अतिरिक्त वनसंपदा नष्ट केली. त्याच्यावर चौकशी करून त्या परिसरात परत वृक्षाची लागवड करून कार्यवाहीसाठी निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री दत्ताजी भरणे आदीसह
जिल्हाधिकारी वाशिम,व्यवस्थापकीय संचालक मेघा सोलर पावर कंपन,उपविभागीय अधिकारी कारंजा,तहसीलदार मानोरा यांना मनोहर राठोड यांनी निवेदन देऊन मागणी केली.
No comments:
Post a Comment