मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला विज्ञान व कै. पांडुरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालय, मानोरा येथे पदवी वितरण समारोह संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या उपस्थिती पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबांच्या प्रतिमापूजन व विद्यापीठ गीताने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक संस्था चे सचिव महादेवभाऊ ठाकरे, प्रमुख उपस्थितीमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माननीय प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे हे उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी एकूण 140 विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदवी वितरित करण्यात आली तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने योजनेतून यशस्वीपणे कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आलीत.
प्रस्तुत प्रसंगी प्राचार्य डॉ एन एस ठाकरे यांनी प्रास्ताविकपर भाषणातून महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना व चाणक्य कौशल्य विकास योजना याबद्दल सविस्तर माहिती प्रदान करून विद्यार्थ्यांना भवितव्याबद्दल अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर कौशल्य आधारित अभ्यासक्रमांकडे अधिक भर विद्यार्थ्यांनी देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे सचिव मा. महादेवभाऊ ठाकरे यांनी उद्योगधंद्यांसाठी आवश्यक असलेले कौशल्य शिक्षण घेण्याचे महत्त्व विशद केले. तसेच महाविद्यालयात असणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत सविस्तर विवेचन केले. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य शाखा अधिष्ठाता डॉ.अविनाश निळे यांनी केले.
कला शाखेत डॉ. ए.वाय.अली, विज्ञान शाखेत डॉ.एस.व्ही.केसवानी आणि वाणिज्य शाखेसाठी डॉ.अविनाश निळे यांनी स्थानिक अधिष्ठाता म्हणून पदवी वितरणाचे समालोचन केले.
वाणिज्य व कला शाखेतील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व. संचालक प्रभाकराव रोकडे स्मृती प्रित्यर्थ श्री नितीन रोकडे यांचे तर्फे चांदीचे पदक *साक्षी दिनकर नेमाने* तसेच कला शाखेतून प्रथम येणाऱ्या *प्रतीक्षा हारके* त्याचप्रमाणे स्व. शामराव ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्राचार्य डॉ. एन.एस.ठाकरे यांचे तर्फे चांदीचे पदक विज्ञान शाखेतून प्रथम येणाऱ्या *नंदिनी राजू गुल्हाने* यांना वितरित करण्यात आले.
प्रस्तुत कार्यक्रमाला महाविद्यालयातील संपूर्ण विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. निखिल भगत यांनी केले.
No comments:
Post a Comment