Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, April 8, 2025

विश्वशांती आणि एक परमात्म्यासाठी संत कबीरांचे तत्त्वज्ञान सर्वतोपरी:-- संत रामपाल जी महाराज


मानोरा:- तालुक्यासह जिल्ह्यातील असंख्य भगत गणांनी वाशिम शहरात आयोजित जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांचे एक दिवसीय सत्संगाचे अमृतप्राशन केले.
 महात्मा फूले लॉन व मंगल कार्यालय येथे करण्यात आलेल्या सत्संगासाठी वाशिम जिल्ह्यातून  असंख्य भक्तांचि उपस्थिती होती. सत्संगाच्या माध्यमातून संत रामपाल जी महाराज यांनी आधी श्रीरामांच्या बद्दल सर्व माहिती दिली. जगासाठी आजच्या भयावह परिस्थिती ची जाणीव करून देत येणाऱ्या काळात होणाऱ्या हिंसेचे प्रारूप समजावून सांगितले. 
कबीर साहेबांचा दोहा सांगत.. कबिरा खडा बाजार मे मांगे सबकी खैर!
 ना हो किसी से दोस्ती, ना हो किसी से बैर.!
या दोह्या प्रमाणे अध्यात्मिक तत्वज्ञानातून धर्माचे अवडंबर दूर सारून सर्व विश्वाला शांती आणि एक परमात्मा हे ज्ञान समजावून सांगितले. 
संत रामपाल जी महाराज यांनी सर्व धर्म ग्रंथातून कबीर हेच परमात्मा आहेत हे सिध्द करून दाखवले.ते दुसरे कोणी नसुन परमात्मा कबीर साहेब
आहेत.या ज्ञानातूनच आज  जगात कट्टर धर्म वादातून जे विष पेरले जात आहे ते दूर होऊन संपूर्ण विश्व एक परमात्मा ची भक्ती करून आनंदाने आणि शांतीने जीवन जगू शकतात.  सर्व धर्मातील गुरू, पंडित आणि प्रसारकाना आवाहन केले की त्यानी हे ज्ञान समजून सर्व प्रभू प्रेमी आत्यांना परमात्मा शरणा मध्ये आणावे. कारण हाच खरा मोक्ष मार्ग असून या द्वारेच पूर्ण परमात्माची प्राप्ती होऊ शकते. संत रामपाल जी महाराज यांचे सत्संग नेहमीच सोशल मीडिया आणि टीव्हीवर चर्चेचा विषय असतो. त्यांचे अनुयायी अनेक प्रकारची अध्यात्मिक पुस्तके गावागावा मध्ये मोफत वाटताना आपण पाहतो. ही नवीन अध्यात्मिक क्रांती
ची सुरुवात आहे असे एकंदरीत याच्या कार्यक्रमातून दिसून येते. सत्संग स्थळी अनेक वयोवृध्द, महिला आणि लहान मुलांनी सुद्धा गर्दी केली होती. सत्संग स्थळी यांची अनेक अध्यात्मिक पुस्तकाचे प्रदर्शन व वितरण सुद्धा करण्यात आले.


No comments:

Post a Comment

फॉलोअर