Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, April 22, 2025

उमरी खुर्दसह सहा गावांमध्ये पोलिस पाटील पदे रिक्त; महसूल विभागाचे दुर्लक्ष






 
उमरी खुर्द( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उमरी खुर्द ही गावे लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत मोठी आहेत. मात्र, उमरी खुर्द गावात गेल्या 15 वर्षांपासून पोलिस पाटील पद रिक्त आहे. स्व. विरसिंग राठोड यांचे निधन झाल्यानंतर आजतागायत हे पद भरले गेलेले नाही.
 *फक्त उमरी खुर्दच नव्हे तर* परिसरातील वसंतनगर, नवाटी, उमरी बु., पिंपळशेंडा आणि पोहरादेवी या गावांमध्येही पोलिस पाटील पदे रिक्त असून महसूल विभागाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

या पदांच्या अनुपस्थितीमुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोणत्याही शासकीय दाखल्यासाठी नागरिकांना जवळपास पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फुल उमरी येथे जावे लागते. विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वच स्तरातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर उमरी खुर्द व परिसरातील ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी (महसूल) कारंजा आणि तहसीलदार मानोरा यांच्याकडे तातडीने पोलिस पाटील पदे भरावीत, अशी मागणी केली आहे.


---

No comments:

Post a Comment

फॉलोअर