Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, April 23, 2025

सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण यवतमाळचे एक यशस्वी पाऊल. आपात्कालिन परिस्थितीत पर्यायी व्यवस्था होणार कार्यान्वित


*यवतमाळ,दि.२३ एप्रिल २०२५;( साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
        १३२ केव्ही एमआयडीसी लोहारा या अती उच्चदाब उपकेंद्रातून ३३ केव्ही पिंपळगाव उपकेंद्रासाठी नविन ५ किमी लांबीची स्वतंत्र वाहिनी उभारून कार्यान्वित करण्यात आली आहे.त्यामुळे निम्म्या शहरातील वीज समस्या निकाली निघणार आहे.शिवाय या नविन वाहिनीमुळे आपात्कालिन परिस्थितीत पर्यायी वीज पुरवठ्याची सोय झाली असल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांनी दिली आहे.

         या अगोदर २२० केव्ही पांढरकवडा रोड या महापारेषणच्या अतीउच्चदाब उपकेंद्रातून ३३ केव्ही वाहिनीव्दारे महावितरणच्या ३३ केव्ही विद्युत भवन आणि ३३ केव्ही पींपळगाव उपकेंद्राला वीज पुरवठा होत होता. महावितरणच्या या दोन्ही उपकेंद्राच्या माध्यमातून निम्म्या शहराला वीज पुरवठा होतो. तसेच हे दोन्ही उपकेंद्र हे एकाच वाहिनीवर असल्यामुळे या वाहिनीवर कुठेही तांत्रिक दोष निर्माण झाल्यास दोन्ही उपकेंद्राचा वीज पुरवठा बंद होत होता.

         परिणामी या समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांच्या पुढाकाराने ३३ केव्ही पींपळगाव उपकेंद्रांसाठी १३२ केव्ही एमआयडीसी लोहारा उपकेंद्रातून ५ किमी लांबीची स्वतंत्र वीज वाहिनी उभारण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम चव्हाण यांच्या नेतृत्वात, श्री पोयाम,श्री देऊळकर यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही वाहिनी चौकाच्या आणि रहदारीच्या ठिकाणी भूमिगत करण्यात आली असून वाहिनीसाठी ८५ नवीन वीजेचे खांब उभारण्यात आले आहे.

        महावितरणच्या या वाहिनीमुळे ३३ केव्ही पींपळगाव उपकेंद्राला १३२ केव्ही लोहारा एमआयडीसीतून आणि  ३३ केव्ही विद्युत भवन उपकेंद्राला २२० केव्ही पांढरकवडा रोड उपकेंद्रातून स्वतंत्र वीज वाहिनीव्दारे वीज पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे विद्युत भाराचे योग्य नियोजन होऊन विद्युत वाहिनी अतीभारीत होण्याची समस्या संपुष्टात आली आहे.शिवाय विद्युत भवन उपकेंद्रातून  पींपळगाव उपकेंद्राला जोडणारी ३३ केव्ही वाहिनी आपात्कालिन परिस्थितीत कार्यान्वित करता येत असल्याने या दोन्ही उपकेंद्राचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर