मानोरा : ग्रामपंचायत देऊरवाडी यांच्या वतीने 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून श्रीराम महाराज सार्वजनिक वाचनालय, चिखली यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आठ पुस्तके भेट देण्यात आली.
या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच आशिष पाटील आणि उपसरपंच अविनाश राठोड यांनी स्वतः वाचनालयाला दिनांक 4 एप्रिल 2025 ला भेट देऊन पुस्तके सुपूर्द केली. वाचनसंस्कृती वाढावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.
यावेळी स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि वाचनालयाच्या व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे स्वागत केले. भविष्यात आणखी शैक्षणिक मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच आशिष पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment