अमरावती, (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
आजच्या युगात विजेशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही, त्यामुळे वीज क्षेत्रात काम करीत असताना ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा तसेच उत्तम ग्राहक सेवा देण्याचे कर्तव्य पार पाडीत असताना ग्राहकांनाही वेळेवर वीज बिल भरण्याची सवय लावून व शंभर टक्के वसुली करून महावितरणच्याप्रति असलेली बांधिलकी जोपासा.
२४ तास निरंतर अखंडित सेवेची मागणी असणारे वीज क्षेत्र असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो
निर्धारपूर्वक केलेल्या प्रयत्नांना योग्य नियोजनाची व अभ्यासाची जोड दिल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन करत मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे (दि.७) अमरावती मंडळ कार्यालयाव्दारे आयोजित आर्थिक वर्ष २०२४ -२५ मध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या कौतूक सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अधीक्षक अभियंता दिपक देवहाते, सहाय्यक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख आणि वरीष्ठ व्यवस्थापक वित्त व लेखा विजय पचारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या ५ परिमंडळामध्ये वीज पुरवठा, ग्राहक सेवा, वीज बिल वसूली अश्या विविध मापदंडावर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ यांच्या कामगिरीमध्ये तफावत आढळते. तुलनेने पूर्व विदर्भातील महावितरणची कामगिरी सरस असून विजबिल वसूलीही कायम १००%, विनासायास आणि वेळेवर होते.
महावितरणच्या पश्चिम विदर्भातील अधिकारी व कर्मचारी यांनी महावितरणचे हित सर्वतोपरी ठेवून आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडल्यास आणि थोडी जास्त मेहनत केल्यास संपूर्ण विदर्भ प्रांताची कामगिरी उंचावेल यात शंका नाही.
यावेळी बोलतांना अधीक्षक अभियंता दिपक देवहाते म्हणाले की, महावितरणमध्ये काम करतांना एकाच वेळी सुरळीत वीज पुरवठ्यासोबत मुदतीत नविन वीज जोडणी,फॉल्टी मिटर बदलविणे, वीज हानी कमी करणे, देखभाल दूरूस्ती,ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण, वीज बिल वसुली यासोबतच अनेक तांत्रिक मापदंडावर काम करावे लागते.प्रत्येकांनी आपले काम वेळेत केल्यास ग्राहकांना समाधान मिळते आणि महावितरणची प्रगती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक कल्पना भुले यांनी केले, कार्यक्रमाला एका सुत्रात गुंफण्याचे काम सहाय्यक विधी अधिकारी आद्यश्री कांबे यांनी केले. तसेच सुत्रसंचालन आणि कार्यक्रमच्या उत्कृष्ट आयोजनाची संपूर्ण तयारी व्यवस्थापक विकास बांबल यांनी केली, तर आभार उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर यांनी मानले. कार्यक्रमाला अधिकारी अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_आर्थिक वर्ष २०२४-२५ जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान_
• सर्वोत्कृष्ट कार्यकारी अभियंता आणि विभाग: विजय कुमार कासट(मोर्शी विभाग)
• शुन्य थकबाकी वितरण केंद्रे :- शेदुरजना घाट, तिवसा घाट, चांदस वाठोडा, पवनी (स) आणि वरूड ग्रामीण -१
• सर्वोत्कृष्ट उपविभाग :- वरूड २, अचलपूर सिटी, चांदुर बाजार, मोर्शी १, मोर्शी २, चिखलदरा, दर्यापूर, अमरावती ग्रामीण, तिवसा, धामणगाव, नांदगांव ख, शेंदूरजना घाट आणि वरूड १
• उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी :- उत्कृष्ठ अतिरिक्त कार्यकारी अभियंता (देखभाल), उपकार्यकारी अभियंता (कार्यालय), उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) आणि (मानव संसाधन)
विशेष सन्मान :- १ - "स्नेहा जावरे*, कनिष्ठ अभियंता (सुवर्ण - बुध्दीबळ ,ऑल इंडिया स्टेट ईलेक्ट्रीसिटी स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या वतीने आयोजित राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धा)
२- फुलसिंग राठोड:- प्रभावी जनसंपर्क सन्मान
No comments:
Post a Comment